भद्रावती: सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल मेडिकल ट्रस्ट व स्वामी समर्थ केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.१९सप्टेंबर रोजी स्थानिक श्रीसंत झिंगुजी महाराज देवस्थान मठ येथे सकाळी साडे १० ते सायं.५ वाजेपावेतो मोफत आरोग्य तपासणी,नाडी परीक्षण व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.160 patients benefited in health and guidance camp
या शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप मांढरे यांचे हस्ते श्री स्वामी समर्थ व श्रीसंत झिंगुजी महाराज यांच्या प्रतिमेला दिप करून करण्यात आले.याप्रसंगी नाडी विषेतज्ञ डॉ.संजय भोसले,डॉ.शुभांगी गौरकार हे प्रामुख्याने उपस्थित होते.त्यानंतर शिबिराला सुरुवात करण्यात आली.या शिबिरात दिवसभरात शहरातील १६० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.यात कर्करोग,रक्तदाब,त्वचा विकार,वात,महिलांचे विकार, पोतांचे विकार ,मुतखडा, मूळव्याध,कावीळ,मधुमेह आदी विकारावर मार्गदर्शन करून १६० जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.या शिबिराचे यशस्वितेसाठी अक्षय यादव,अशोक सुतार,ज्योती नागपुरे,शुभांगी लांबट,अर्चना कोंबे व धनश्री नागपुरे यांनी अथक परिश्रम घेतले.शेवटी श्री स्वामी समर्थ यांच्या प्रार्थने द्वारे शिबिराची सांगता झाली.

0 comments:
Post a Comment