Ads

माता महाकाली महोत्सवासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले राज्यपालांना निमंत्रण

मुंबई :- चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिराची महती आणि गोंडकालीन शिल्पकलेचा प्रचार प्रसार करण्यासाठी नवरात्रो उत्सवादरम्याण भव्य माता महाकाली महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली असुन सदर महोत्सवाचे निमंत्रण दिले आहे. यावेळी माजी नगर सेवक बलराम डोडाणी, रोटरी क्लबचे प्रकल्प प्रमुख अजय जयस्वाल, महाकाली भक्त कुक्कु साहाणी, अजय चिंतावार आदिंची उपस्थिती होती. MLA Kishore Jorgewar invites Governor for Mata Mahakali Festival
चंद्रपूरात प्रथमच भव्य महाकाली महोत्सव घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन तथा माता महाकाली भक्तगण यांच्या पूढाकाराने सदर महोत्सव नवरात्री उत्सवादरम्याण आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सवाला महाकाली भक्तांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्याण सदर महोत्सवात उपस्थिती दर्शविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथील राजभवनात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेत नियोजित माता महाकाली महोत्सवबाबत माहिती दिली असुन त्यांना महोत्सवासाठी आमंत्रित केले आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरातील श्री. माता महाकाली मंदिराच्या गोंड कालीन इतिहासाची त्यांना माहिती दिली. येथील प्राचीन वास्तुंबाबत त्यांना अवगत केले. गोंड कालीन उत्तम शिल्प आणि चंद्रपूरच्या माता महाकालीची महती दर्शवणारा हा महोत्सव असुन आपण या महोत्सवाला उपस्थित राहावे अशी विनंती यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना माता महाकाली भक्तगणांच्या वतीने केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment