Ads

धाबा तलाठी कार्यातील तलाठी व कोतवाल यांना रु 2000 ची लाच स्विकारताना रंगेहात अटक

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-तक्रारदार मौजा धाबा येथील रहिवासी असून आणि शेतीचे काम करतो व पदवीचे शिक्षण सुरू आहे. तक्रारदार यांचे आजीचे नावांनी मौजा धावा येथिल शेत सर्व्हे न १४३ /२ मध्ये ०.८१ हे आर व मौजा कोंढाणा येथिल शेत सर्व्हे नं २४ मध्ये ०.५२ हे आर. शेती जमीन होती. ति दिनांक ०२/०५/२०२१ रोजी मरण पावली आहे. तक्रारदार यांचे आजीच्या मृत्युनंतर आजीचे नाव कमी करून तक्रारदार व त्यांचे नातेवाईकाचे नाव मौजा धाबा येथिल सर्व्हे न १४३/२ व कोंढाणा येथिल सर्व्हे नं २४ च्या सातबारा रेकॉर्डला नोंद करण्याच्या कामाकरिता ४,०००/- रुपये ची लाच मागत असल्याबाबत तक्रारदार यांनी मोबाईल अॅप व्दारे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे ऑनलाईन complaint@acbinaharastra.net तक्रार नोंदविली.
Talathi and Kotwal of Dhaba Talathi operation arrested red-handed while accepting bribe of Rs 2000
प्राप्त तक्रारीवरून दिनांक २६/०९/२०२२ रोजी गै.अ. ओंकार भदाडे, तलाठी, तलाठी कार्यालय धाबा, साजा क्र. १७ यांचेविरूध्द पडताळणी कार्यवाही केली असता तक्रारदार यांचे आजीच्या मृत्युनंतर आजीचे नाव कमी करून तक्रारदार व त्याचे नातेवाईकांचे नाव मौजा धाबा येथिल सर्व्हे न १४३ /२ व कोंढाणा येथिल सर्व्हे नं २४ च्या सातबारा रेकॉर्डला नोंद करण्याच्या कामाकरिता तडजोडीअंती २,०००/ रूपये ची मागणी केली. दिनांक २८/०९/२०२२ रोजी सापळा कार्यवाही दरम्यान गै अ. ओंकार संजय भदाडे, तलाठी, धाबा साजा के १७ यांनी तक्रारदाराकडे २,०००/-रु लाचेची मागणी करून गै. अ. चंद्रकांत नेमचंद मुंजेकर, कोतवाल यांचे मार्फतीने लाचरक्कम स्विकारल्याने ओंकार संजय भिदाडे, तलाठी, धाबा साजा क्र. १७ व गै.अ. चंद्रकांत नेमचंद मुजेकर, कोतवाल, तलाठी कार्यालय धावा यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पुढील तपास कार्य सुरु आहे.

सदरची कार्यवाही ही श्री. राकेश ओला, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर, श्री. मधुकर गिते. अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक, श्री. अविनाश भामरे, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि. जितेंद्र गुरनुले, नापोकॉ. नरेशकुमार नन्नावरे, नापोकॉ. संदेश वाघमारे, पो.अ. राकेश जांभुळकर, म.पो.अ. पु पा काचोळे, व चालक पो.अ.सतिश सिडाम ला.प्र.वि. चंद्रपुर यांनी यशस्वी पार पाडली आहे.

यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी / कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment