Ads

विनयभंग करणाऱ्या आरोपीस 3 वर्षाचा सश्रम कारावास

दिनांक २९.०४.२०१४ रोजी यातील फिर्यादी हिने पो.स्टे. भद्रावती येथे तक्रार दिली की, आरोपी नामे विनोद नामदेवराव देंगने वय ३४ वर्ष रा. कुणबी सोसायटी भद्रावती याने घटना तारीख वेळी फिर्यादीचे कुंटूबात चांगले संबंधाचा फायदा घेवून फिर्यादीची पिडीत मुलगी हिचे गळ्यात हात घालून अश्लिल वर्तन केले. तसेच तिचा पाठलाग करूण व रस्ता अडवून विनयभंग केला. फिर्यादीचे अश्या तक्रारीवरून पो.स्टे. भद्रावती येथे अप.क्र. २५/२०१४ कलम ३५४ (अ) (3) भादवीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
3 years rigorous imprisonment for molesting accused
सदर गुन्हयात तपासी अधिकारी सफौ. ९२६ / सुधाकर ढवळे पो.स्टे. भद्रावती यांनी गुन्हयाचा तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र मा. प्रथमवर्ग न्यायालय भद्रावती येथे दाखल केले. सदर गुन्हयात आज दिनाक २८/०९/२०२२ रोजी श्री. डी.एस. शर्मा, न्यायदंडाधिकारी, प्रथमवर्ग न्यायालय भद्रावती यांनी आरोपीस कलम ३५४ (अ) (ड) भादवी मध्ये ०३ वर्ष सश्रम कारावास व ३०००/-रु. दंड याप्रमाणे शिक्षा सुनावली आहे.

सदर गुन्हयातील फिर्यादी व साक्षदार यांना पोलीस निरीक्षक गोपाल भारती, सा. मपोहवा / ९०० निलीमा नलोडे, पो.अ./१०९० अंकुश खंडाळे सर्व पो.स्टे. भद्रावती यांनी योग्य मार्गदर्शन केले. सदर गुन्हयात अॅड. श्री. मनोज खंडाळकर यांनी सरकारी पक्षातर्फे कामकाज पाहीले.
न्यायाधीश शर्मा यांनी यांनी दिलेल्या सुनावणीत मागील महिन्यात महिलांना योग्यरीत्या न्याय मिळाला त्यामुळे महिलांमध्ये आनंद व चैतन्याचे दिसून आले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment