चंद्रपुर :या पुर्वी झालेल्या बैठकीत अमृत कलश योजनेच्या कामाला गती देण्याच्या सुचना आपण केल्या होत्या. त्यानंतर कामाला गती मिळाली. मात्र अद्यापही अपेक्षीत असे काम झालेले नाही. आता यापूढे सदर योजनेच्या कामांना प्राधान्य देत युद्ध स्तरावर काम करून योजनेसाठी खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी करत एक महिन्यात ही योजना पूर्णतः कार्यन्वीत करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-र्यांना दिल्या आहे.
Amrit Kalash Yojana to be fully implemented in one month -MLA. Kishore jorgewar
चंद्रपूर महानगर पालिकेच्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आज सोमवारी मनपा सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-र्यांना सदर सूचना केल्या आहे. या बैठकीला मनपा आयुक्त विपिन पालिवाल, सहायक आयुक्त विद्या पाटील, मुख्य अभियंता महेश बारई, अभियंता अनिल घुमडे, विजय बोरिकर, नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक सुनिल दहिकर, अभियंता सौरभ गौतम, डॉ. अमोल शेळके यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अमृत कलश योजनेसाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहे. सदर रस्ते दुरस्त करण्याच्या सुचना आपण केल्या होत्या त्या नंतर 540 किलोमीटर मार्ग आपण दुरस्त केला. मात्र अद्यापही 158 किमी मार्गांची दुरस्ती बाकी आहे. त्यामुळे हे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. आपण सध्या स्थितीत केवळ 21 ते 22 हजार अमृत कलश योजने अंतर्गत नळ जोडण्या केल्या आहे. अद्यापही 4 झोनमध्ये अमृत कलश योजनेचे काम पुर्ण झालेले नाही. हे काम 1 डिसंेबर पर्यंत पुर्ण करण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. छोपडपट्टी वासियांना पट्टे वाटप करण्याची प्रक्रिया संत गतीने पूढे जात आहे. याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी नाराजीही प्रकट केली. पट्टे वाटप प्रक्रिया गतीशील करा यात येणा-र्या अडचणी सोडविण्यासाठी याबाबत सचिव स्तरावर बैठक लावणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. जटपुरा गेटची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रायोजित तत्वावर करण्यात आलेली उपाययोजना योग्य प्रकारे राबवा, तेथे दिशादर्शक फलक लावण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. चंद्रपूरला पाणी पूरवठा करण्यासाठी इरई धरण हे एकमात्र स्त्रोत आहे. त्यामुळे आपण धानोरा बॅरेज तयार करण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. तेथील पाण्याची उचल कशी करता येईल यासाठीही मनपा प्रशासनाने नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. धार्मीक आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करण्याचेही आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. खर्च कमी करण्यासाठी कर्मचा-र्यांची संख्या कमी करुन नका कामगारांना विविध विभागात सामावून घेण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या. घंटागाडी दुरुस्त करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे नादुरुस्त घंडागाडी ओढत असतांना कामगारांना मोठा त्रास होत आहे. याकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचना यावेळी करण्यात आल्या आहे. सराई मार्केट मध्ये होणारी खाण त्रासदायक असुन याचा पर्याय शोधण्यात यावा, कचरा टाकण्यासाठी वार्डा - वार्डात असलेल्या झेंड्या बंद करण्यात याव्यात, मनपाने उत्पन्नाची साधने वाढवावी, नागरिकांना नळ बिल भरण्यासाठी टप्पे वारी आखुन द्यावी आदि सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला केल्या आहे. सोबतच नगोरात्थान आणि दलीत वस्तीचा वाढीव निधी मनपाला मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. या बैठकीला यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहर अध्यक्ष कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे शहर युथ अध्यक्ष राशेद हूसेन, विश्वजीत शाहा, विलास वनकर, विलास सोमलवार, विनोद अनंतवार, मंगेश अहिरकर, किशोर बोलमवार, अॅड. परमहंस यादव, सायली येरणे, सविता दंडारे, चंदा ईटनकर, आशा देशमुख, शमा काझी, अस्मिता डोणारकर, कविता निखूरे, रुपा परसराम, वंदना हजारे, वैशाली मद्दीवार आदींची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment