चंद्रपुर :जश्ने--ईद-ए-मिलादुन्नबी निमित्य मकरजी सिरतुन्नबी कमेटीच्या वतीने शहराच्या मुख्य मार्गाने काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे छोटा बाजार चैचौकात आमदार किशोर जोरगेवार यांनी भव्य स्वागत केले. यावेळी आ. जोरगेवार यांनी शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व मौलाना यांचे पुष्पहार, शाल देऊन स्वागत केले तसेच सर्व मुस्लीम बांधवांना जश्ने-ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या.
दरवर्षी प्रमाणे यंदा हि मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने जश्ने-ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात सजारी करण्यात आली. या निमित्त शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. कोहिनूर तलाव जवळून निघालेली ही शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गाने मार्गस्त झाली. सदर शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने छोटा बाजार चौक येथे मंच उभारला होता. शोभायात्रा येथे पोहचताच सदर मंचावरून आमदार किशोर जोरगेवार यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्याक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, अल्प संख्याक विभागाचे युवा नेते इमरान खान, यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, असलम खान, जावेद शेख, ऐजाज शेख, शादाब शेख, रेहान शेख, ऐजाज खान, सोहैब शेख, जोसेफ शेख, रफिक खान, विलास वनकर, आशिम खान, हेरमन जोसेफ, अबरार सय्यद, इरफान खान, उमेर अन्सारी आदिंची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment