चंद्रपूर : मांगल्यपूर्ण दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करीत साजरा केला जातो. दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते. पण, खासदार बाळूभाऊ धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी चक्क तृतीयपंथींचे शुभ आशीर्वाद घेत या समुदायासोबत दिवाळी साजरी केली. मागील दिवाळीत घर देण्याची घोषणा खासदार बाळू धानोरकर यांनी केली होती. त्यांच्या घराचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आहेत. काही महिन्यातच तृतीयपंथीं बांधवांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
मागील दोन वर्षात कोरोनाचे भीषण संकट होते. लॉकडाऊनमुळे असंघटित आणि अल्पसंख्याक असलेला तृतीयपंथी वर्ग मोठ्या प्रमाणात भरडला गेला होता. त्यांना उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. अशा स्थितीत दिवाळी सणाचे आनंद द्विगुणीत करण्यासाठी खासदार बाळूभाऊ धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तृतीयपंथी समुदायाला घरी निमंत्रित केले होते. आपल्याला निखळ आनंद देणारी दिवाळी साजरी करण्यासाठी हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी या समुदायाच्या चेह-यावर स्नेह, प्रेम आणि आनंद झळकत होता.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव विनोद दत्तात्रय, काँग्रेस महिला ग्रामीण अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, एनएसयूआय अध्यक्ष यश दत्तात्रय, काँग्रेस युवा नेते राज यादव, पप्पू सिद्धीकी, तृतीयपंथी बांधवांमध्ये साजन, बिंदिया नायक, बिपाशा, स्वीटी, पिंकी, करीना, राखी यांची उपस्थिती होती.
यावेळी धानोरकर दाम्पत्याने तृतीयपंथी लोकांची आस्थेने विचारपूस करीत संवाद साधला. त्यांच्या समस्या, समाजाकडून अपेक्षा काय आहेत हे ही जाणून घेतले. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण राष्ट्रीय पातळीवर हा आवाज उचलणार असे आश्वासन खासदार बाळू धानोरकर यांनी दिले. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी त्यांच्या समस्यांच्या आवाज विधानसभेत मांडला होता. पोलीस भरतीत त्यांना २ टक्के आरक्षण देण्याची मागणी केली होती. ती देखील पुढे देखील लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे बाळू धानोरकर हे लोकसभेला उभे असताना त्यांच्या प्रचाराची धुरा तृतीयपंथी लोकांनी सांभाळली होती. तेव्हापासूनच धानोरकर या समाजाशी सातत्याने जुळून आहेत. याचित फलश्रुती म्हणून त्यांनी दिवाळीला तृतीयपंथी लोकांना बोलावून ते देखील आपल्या कुटुंबाचा भाग आहे असा संदेश दिला.
0 comments:
Post a Comment