Ads

निलजई व उकणी येथील शेतजमीनीची नुकसान भरपाई संबंधीत शेतक-यांना त्‍वरित द्यावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

चंद्रपुर :- निलजई व उकणी येथील शेतजमीनींच्‍या झालेल्‍या नुकसानाची भरपाई त्‍वरित संबंधीत शेतक-यांना देण्‍यात यावी तसेच शेतातील पावसाचे पाणी काढण्‍याच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक ड्रेन त्‍वरित तयार करण्‍यात यावी. येत्‍या दिड महिन्‍यात शेतातील पाणी काढण्‍यात आले नाही तर वेकोली ने संबंधीत शेतजमीनी संपादीत कराव्‍या असे निर्देश चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री तथा राज्‍याचे वने व सांस्‍कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
Forest Minister Sudhir Mungantiwar directs farmers to expedite compensation ofagricultural land in Niljai and Ukani
दि. ०३ ऑक्‍टोंबर रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनभवन नागपूर येथे वरिल विषयाच्‍या अनुषंगाने वेस्‍टर्न कोलफिल्‍डस लिमिटेडचे सीएमडी श्री. मनोज कुमार, कार्मीक संचालक श्री. संजय कुमार, मुख्‍य महाप्रबंधक श्री. आभास सिंह यांच्‍यासह बैठक घेतली.

निलजई व उकणी या गावांमध्‍ये वेकोलीच्‍या चुकीच्‍या नियोजनामुळे २०१९ पासून पावसाचे पाणी शेतीजमीनीमध्‍ये जमा होवुन शेताचे स्‍वरुप तलावाप्रमाणे झाल्‍याची तक्रार शेतक-यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे केली. या तक्रारीच्‍या अनुषंगाने सुधीर मुनगंटीवार यांनी वेकोलीच्‍या उच्‍चाधिका-यांसह बैठक घेवुन चर्चा केली. २०१९ पासून शेतपाण्‍याखाली येत असल्‍यामुळे झालेल्‍या नुकसानाची भरपाई वेकोलीने द्यावी, शेतजमीन वेकोलीने अधिग्रहीत करावी आदी मागण्‍या शेतक-यांनी या बैठकीत केल्‍या. या संदर्भात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत वेकोली प्रशासनाला योग्‍य कार्यवाहीचे निर्देश दिले. या संदर्भात त्‍वरित मागण्‍या तपासून योग्‍य कार्यवाही करण्‍यात येईल असे आश्‍वासन वेकोलीचे सीएमडी श्री. मनोज कुमार यांनी दिले. या बैठकीत भाजयुमो प्रदेश सचिव विवेक बोढे, अमोल थेरे, धनराज पारखी, सुरेंद्र भोंगळे, बबलु सातपुते यांच्‍यासह संबंधीत शेतक-यांची उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment