Ads

अभियंत्याला 2 लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

चंद्रपुर :-चंद्रपूर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याने कंत्राटदाराला 2 लाख रुपयांची लाच मागितल्याने एकच खळबळ उडाली. Bribery
Engineer arrested red-handed while accepting bribe of 2 lakhs
वर्ष 2021 मध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात फिर्यादी कंत्राटदाराने RCLWE केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत मुंगसाजी कन्स्ट्रक्शन कंपनी यवतमाळ तर्फे जिल्ह्यातील जिवती येथे पुलाचे बांधकाम करण्यात आले. सदर पूल बांधणीचे काम पूर्ण झाले होते, पूल बांधणीच्या कामाचे अभियंता अनिल शिंदे यांनीपाहणी सुद्धा केली.

संपूर्ण बांधकामाचे अंदाजे 1 कोटी रुपयांचे एकूण 4 बिलांपैकी 2 बिल तयार करीत मंजूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर येथे पाठविण्यासाठी अभियंता शिंदे यांनी फिर्यादीला 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. Acb trap फिर्यादी यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने 7 जून ला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

8 जून ला तक्रारीची पडताळणी केल्यावर सापळा रचला, बिलाची रक्कम मंजूर झाल्यावर लाचेची रक्कम 2 लाख रुपये देण्याचे ठरले. Crime news 1 नोव्हेंबर ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला, फिर्यादी कडून अभियंता अनिल शिंदे यांना 2 लाख रुपये स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. Anti corruption trap chandrapur

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, मधुकर गीते अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे, पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांच्या नेतृत्वाखाली रमेश दुपारे, रोशन चांदेकर, नरेश नन्नावरे, रवी ढेंगळे, वैभव गाडगे, अमोल सिडाम, मेघा मोहूर्ले, पुष्पा काचोळे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment