Ads

भद्रावतीचे सुपुत्र यांचे गिनीज बुक ऑफ रेकार्ड मध्ये होणार नोंद

भद्रावती तालुका प्रतिनिधी: भद्रावतीचे सुपुत्र माजी नौसैनिक आणी वरूड तालुक्यात सद्या कार्यरत तलाठी देवानंद मेश्राम यांनी काश्मीर श्रीनगर ते कन्याकुमारी 3626 कि.मी. सायकल प्रवास सरासरी 325 किमी रोज प्रमाणे 13 राज्यामधुन 11 दिवस 12 तास 10 मिनीटात पुर्ण करून आणखी एक विक्रम आपल्या नावे केलेल आहे. 50 ते 60 वर्षे या वयोगटामधून हा प्रवास पूर्ण करणारे हे पहिले व्यक्ती ठरले त्यामुळे त्यांच्या या विक्रमाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.Bhadravati's son will be recorded in the Guinness Book of Records
सायकल स्वार ग्रृपच्या माध्यमातुन देवानंद मेश्राम यांनी अनेक ब्रेव्हेट जिंकल्या आहेत. हजारो किमी सायकलींग करून विक्रम करणारे देवानंद यांनी प्रदुषणमुक्त भारत हा संदेश देवून सायकलींगचे महत्व पटवून दिले आहे.
पहिल्या दिवशी नऊ ऑक्टोबरला कश्मीर-पठाणकोट-होशियारपूर मार्गे कुरुक्षेत्र असा 303 किलोमीटर तर दुसऱ्या दिवशी 10 ऑक्टोबरला पठाणकोट मधून सायकल प्रवास सुरू होऊन कुरुक्षेत्र पर्यंत 332 किलोमीटर आणि 11 ऑक्टोंबर ला कुरुक्षेत्र ते झाशी जवळ 312 किलोमीटर असे तीन दिवसात 947 किलोमीटर अंतर सायकलने पूर्ण केले.12 ऑक्टोबर ला झाशी ते काटंजी 314 किमी ,काटंजी ते नागपूर पर्यंत 607 किमी चा प्रवास पार केला. समोर नागपूर ते आर्मूल 314 किमी , आर्मूल ते जडचेरला 263 किमी , जडचेरला ते मेहबूब नगर 274 किमी चा प्रवास पूर्ण करून समोर मेहबुब नगर ते हसुर 249 किमी, हसुर ते वेदासंदूर 309 किमी व वेदासंदुर ते कन्याकुमारी 313 किमी चा हा शेवटचा टप्पा करून जागतिक विक्रम आपल्या नावी नोंदविला.
देवानंद मेश्राम मूळचे चंद्रपूर जिल्ह्याचे भद्रावती सुमठाना रहिवाशी असून त्यांनी आपले शालेय शिक्षण 12वी पर्यंतचे केंद्रीय विद्यालय व आयुध निर्माण हायस्कुल येथे ईथुन पुर्ण केले व देशसेवेकरीता नौदलात भरती झालेत. आपली देशसेवा पुर्ण करून सेवानिवृत्ती नंतर सध्या वरुड तालुक्यामध्ये तलाठी या पदावर कार्यरत असून त्यांनी हा नवा जागतीक विक्रम केला.
देवानंदने आपल्या ह्या जागतिक विक्रमाच्या यश हे नागपूर येथील डॉ. अमित समर्थ यांच्या प्रशिक्षणा मुळे साध्य झालेत अस ही नमूद केले.
भद्रावती आयुध निर्माणी येथील शाळेतील मित्र गीता पाटील, रघू चेपूरवार, आशिष सिंह, सुब्रत हल्दार, कावडकर मॅडम तसेच ईतर मित्र व शिक्षकवृंदानी आर्थीक सहकार्य केले. धीरज महाडिक , राजेश लोंढे , आकाश मल्लिक , दिनेश धुर्वे , ज्ञानेश्वर राऊत , विशाल वानखडे व सारंग वाघमारे क्रू मेम्बर यांनी विशेष मेहनत व सहकार्याने घेतले.
त्यांच्या या उपक्रमाला महसूल विभागातील सर्व अधिकारी , सहकारी मित्र त्यांना नेहमी सहकार्य करतात. जागतिक विक्रमाचे श्रेय देवानंद यांनी आपल्या कुटुंब आई वडील, तसेच आयुध निर्माणी हायस्कुल मित्र रघू चेपूरवार, विनोद वर्मा, माधुरी रंभाड व ईतर, सायकल स्वार ग्रुप व भद्रावती तसेच वरूड तालुक्यातील सर्व जनतेला देत आहे, जे नेहमी त्यांच्या उपक्रमा मध्ये सहकार्य करतात असे नमूद केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment