सावली : Tiger Attack News सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या उपरी जंगल परिसरात स्वतःच्या म्हशी चरायला नेले असता खुशाल कवडू शेट्ये वय 50 वर्ष, यांचेवर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले.
या घटनेची माहिती जंगल परिसरात जवळपास असलेल्या लोकांना कळताच आरडाओरड करीत घटनास्थळाकडे धाव घेतली, त्यामुळे वाघ तिथुन पळाला.
जखमी गुराख्यास त्वरित गडचिरोली येतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सदर घटन दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
व्याहड बूज ते काढोली या रस्त्यालगत अनेक गावे असून बसलेली सर्व गावे ही जंगल परिसरात असल्याने अनेकदा सदर रस्त्यावर वाघ किंवा बिबट यांचे हल्ले झाले व हल्यातंर्गत काही नागरिक मृत्यू तर काही नागरिक जखमी झाले असल्याने वनविभागावर परिसरातील जनतेकडून रोष व्यक्त केला जात आहे. सध्या हलके धान कापणीला सुरुवात झाली असून
0 comments:
Post a Comment