चंद्रपुर :बल्लारपुर रेल्वे स्टेशन वरील पादचारी पुल कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटने नंतर पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली . पादचारी पुल कोसळल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. रेल्वे विभागातर्फे मृत शिक्षिकेच्या कुटुंबियाना आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी रेल्वे मंत्र्यांकड़े केली
*Guardian Minister Sudhir Mungantiwar's visit to the spot following the collapse of pedestrian bridge at Ballarpur railway station*
त्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट घेत जखमिंची व नातेवाईकांची विचारपुस केली. या दुर्घटनेतील मृतकाच्या कुटुंबियाना 5 लक्ष रु चे अर्थसहाय्य मुख्यमंत्री निधीतुन मिळावे यासाठी आपण मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना भेटून प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
0 comments:
Post a Comment