Ads

खासदार धानोरकरांचा जनता दरबारात मनपाचा तक्रारीच्या पाऊस

चंद्रपूर : खासदार बाळू धानोरकर हे नेहमी सामान्य जनतेचे लोकहितकारी समस्या दूर करीत असतात. आज चंद्रपूर येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते. यामध्ये शेकडो निवेदन हे महानगर पालिका क्षेत्रातील समस्यांचे आले. या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असून लवकरच महानगर पालिका प्रशासनासोबत जनता दरबाराचे आयोजन करण्यात असल्याचे यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितले.
MP Dhanorkar's Public Radi's Complaint Rain
यावेळी अमृत योजना, मल निस्सारण, महानगर पालिकेत काम करताना मृत पावलेल्या पाल्याचा अनुकंपा धारकांच्या प्रश्न, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी पुर्नचक्रीकरण व पुर्णवापर, शहरातील प्रदुषण नियंत्रणाबाबत मनपा काय उपाययोजना करीत आहे अशा विविध समस्या निवेदनात नमूद करण्यात आले. त्यासोबत गोल बाजार येथे गाळेधारकांचा २०० पटीने वाढविलेले भाडे हि बाब त्या व्यापाऱ्यांवर अन्याय करणारी आहे. त्यासोबतच शहरातील इतर समस्यांचे देखील यावेळी निवेदन देण्यात आले.

त्यासोबत महानिर्मिती मध्ये तंत्रज्ञ - ३ पदाच्या भारतीकरिता सामाजिक उत्तरदायित्व योजनेअंतर्गत कोराडीतील औष्णिक विद्युत केंद्र महानिर्मिती मध्ये मिळणाऱ्या सामाजिक दायित्व निधी मार्फत प्रति पाच वर्ष गुण असे एकूण कमाल २५ गुणांचा विरोधात गोंडवाना येथील सिनेट सदस्य निलेश बेलखडे यांच्या नेतृत्वात खासदार बाळू धानोरकर यांना निवेदन देण्यात आले. हि समस्या अतिशय गंभीर असून चंद्रपूर येथील युवकांवर अन्याय करणारी आहे. त्याकरिता मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक बोलावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment