Ads

एक दिवस जरी देशात संविधान पूर्णतः लागू झाले तरी या देशातील सर्व समाजघटकांचे उत्थान होईल : ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपुर : २६ नोव्हेंबर हा संविधान दिन Constitution Day म्हणून संपूर्ण देशात साजरा होतो. याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी ओबीसी समुदायाला घरोघरी गावोगावी संविधान दिन मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील विविध तालुक्यात संविधान दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. शहरात सिव्हील लाईन येथे आयोजित कार्यक्रमात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व समजावून सांगण्यात आले.One day even if the constitution is fully implemented in the country, all the social elements of this country will be uplifted: OBC leader Dr. Ashok Jivatode
डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले की, एक दिवस जरी देशात संविधान पूर्णतः लागू झाले तरी या देशातील सर्व समाजघटकांचे उत्थान होईल व देशातील बहुतांश समस्या निकाली लागेल. संविधान हाच जगण्याचा आधार असून देशातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याची क्षमता ठेवते. तेव्हा संविधान दिन हा राष्ट्रीय सण समजून प्रत्येकांनी दरवर्षी असाच घर, कार्यालय, परिसर व समाजातून हा दिवस देशभक्तीच्या भावनेने साजरा करायला हवा. यावेळी ओबीसी व इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. एम. सुभाष, नितीन कुकडे, विजय मालेकर, संजय सपाटे, कविता रंगारी, डॉ. आशीष महातळे, डॉ. कुंदन पाटील, विनायक बोडाले, रविकांत वरारकर, रवि जोगी, वानखेडे, अमर बलकी, गणेश येरगुडे, कन्नाके, माया धमगाये, जोत्सना राजूरकर, मंजुळा डूडूरे, अशोक बुटले, सुरेंद्र अडबाले, देवेंद्र बलकी, सचिन मोहितकर, नरेंद्र धांडे, वैशाली पोडे, हेलवटे, अर्चना काळे, छाया उपगंलावार, पावडे सविता ठावरी, मुप्पावार, संदीप सातपुते, आकाश जुनघरी, स्वप्निल खनके, प्रशांत गाडगे, निळकंठ पायघन, प्रकाश जांभूळकर, योगेश पाचभाई, पी.एस. लांडे आदी उपस्थित होते.
--------------------------------------
ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात ठिकठिकाणी संपन्न कार्यक्रम

भद्रावती येथे संविधान दिनानिमित्त स्थानिक बौध्द लेणी येथील सभागृहात संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी नितीन खरवडे, राकेश खुसपुरे, अमोल नागपुरे जितू पारखी, अभय ठेपाले राजेश ताजने, दीपक कावटे, योगेश नागपुरे, भोला नागपुरे, अमोल ढोके, विकास डुकरे आनंद शिरसागर, संदीप गोखरे, भूषण बोडाले, सचिन नक्षिणे, रोशन खाडे, अभय ढाले, चेतन निब्रड आदी उपस्थित होते.

वरोरा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. लक्ष्मणराव गमे, कौरासे, कावळे, बोरीकर, जोगी, गेडाम, अरुण जोगी, प्रणव उलमाले, खाणेकर, विनोद कारेकर, मत्ते, गाडगे, सौ. शेंडे, सौ. झाडे आदी उपस्थित होते.

चिमूर येथे न्यू राष्ट्रीय शाळा, चिमूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आमडी या शाळांना संविधान उद्देश पत्रिकेची /प्रस्ताविका प्रतिमेच्या स्वरूपात भेट देण्यात आली. यावेळी एस. आर. खोब्रागडे, यु. एन. नवहाते, मेश्राम, रोकडे, लडी, वामन गुळदे, माजी सरपंच सुनील गुळदे, प्रफुल डरे, रामदास विताळे, चांदणखेडे, वरखेडे, डोंगरे, प्रकाश झाडे, गांधी बोरकर आदी उपस्थित होते.

घुघुस येथे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मालेकर, संजय भोंगळे, उषा आगदारी, गणपत लभाने, विठोबा बोबडे, ज्ञानेश्वर काळे, किरण नक्षीने, अशोक पिदुरकर, पुंडलिक खनके, दामोदर ढेंगळे, योगेश निब्रड, गणपत लांडगे, सोमाजी घुत्ते, जनार्दन घबाडे, कांता बाघ, विद्या आत्राम, उषा बुटले, मीनाक्षी खानोरकर, विठोबा पोले, आदी उपस्थित होते.

ताडाळी येथे विद्यार्थ्यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी भास्कर जिवतोडे, निखिलेश चामरे, आत्राम, सौ पिदूरकर, श्रीमती भगत, सौ. बुचे, गोहोकर, बोबडे, बांबोडे, जुनघरे, साहिल धोंगडे, हरिषचंद्र जानवे आदी उपस्थित होते.

गोंडपिपरी येथे संविधान दिनानिमित्त प्रभात फेरी काढून संविधान चिरायू होवो, याकरीता शपथ घेण्यात आली. आयोजित कार्यक्रमात बळीराजा निकोडे, एस.एस. पठाण, बंडू दुर्गे, संतोष बांदूरकर, नंदकिशोर दिवसे, महादेव शेंद्रे, लाडे, किशोर पठाडे, एस एम बेताल, सुहास ठावरी, शांताराम काळे, माथने सर, अजय काळे, कोकाटे, तितरमारे, बोबडे, मोरे, नागापुरे, बोर्डे, विरुटकर, आदी उपस्थित होते.

पोंभुर्णा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष रंजीत खोब्रागडे, अजीत मंगळगिरीवार, शाम गेडाम, अविनाश वाळके, जीवने, मोहन चलाख, बबनराव गोरंतवार, अशोकराव गेडाम, जयपाल गेडाम, सौ.सुलभाताई पिपरे, अमरसिंह बघेल, वसंत भोयर, व्यंकटेश चलाख, प्रेमसिंग मुळे, योगेश पेन्टेवार आदी उपस्थित होते.

बल्लारपूर येथे संविधान दिन प्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषण स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. आणि विजेत्या स्पर्धकांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. मधुकरजी मत्ते, पंकज मत्ते, प्रकाश उरकुंडे, गजू उमरे, सुनील टोंगे, महेश पानघाटे, देविदास कुबडे, पुरुषोत्तम सातपुते, विकास खाडे, संदीप गौरकार, डेजूलीना मीनमुले आदी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment