भद्रावती जावेद शेख : चंद्रपूर–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (NH-930) ऊर्जाग्राम गेटसमोर एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. ही घटना भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.ST bus hits bike in Bhadravati; 17-year-old dies on the spot
मृतकाचे नाव बादल सुनील भोयर (वय १७, रा. गोरजा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) असे आहे. या अपघातात दुचाकी चालक साहिल मोरेश्वर गोरे (वय २१, रा. चीरादेवी) आणि तनुज सुभाष ढवस (वय १८, रा. घोट निंबाळा) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी क्रमांक MH-34-CF-8510 वर तिघे जण प्रवास करीत होते. ऊर्जाग्राम कॉलनीतून दुचाकीने NH-930 महामार्गावर प्रवेश करत असताना त्याचवेळी एसटी बस क्रमांक MH-14-MH-5322 ने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे दुचाकीवरील सर्वात मागे बसलेला बादल भोयर रस्त्यावर फेकला गेला आणि तो एसटी बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, दुचाकी चालक साहिल गोरे आणि तनुज ढवस हे दोघे डिव्हायडरवर पडल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. मृतक बादल भोयर याला पुढील कार्यवाहीसाठी खासगी टाटा एस वाहनातून शासकीय रुग्णालय, भद्रावती येथे पाठविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच भद्रावती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन खेत्रे, API धोंगडे, ASI नायडू, HC नितेश, PC कसारे, HC गंदेवार, PC धीरज आणि भूषण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी उपस्थित असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
0 comments:
Post a Comment