माजरी जावेद शेख : पोलीस स्टेशन माजरीच्या वतीने १८ ऑगस्ट २०२६ रोजी माजरी परिसरातील कार्मेल अकॅडमी, कर्मवीर विद्यालय, हिंदी महावीर विद्यालय माजरी तसेच केंद्रीय विद्यालय, कुचना येथे अंमली पदार्थांविरोधी जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन करून अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा देण्यात आली.
The message of “Drug-free youth – safe society”; Majri police provide anti-drug guidance to students
अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व आरोग्यविषयक दुष्परिणाम, तसेच व्यसनामुळे होणारे सामाजिक व कौटुंबिक नुकसान याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देताना विद्यार्थ्यांनी शिक्षण, खेळ, कौशल्यविकास आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळावे, असे आवाहन करण्यात आले.
अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक, साठवणूक व सेवन हा कायद्याने दंडनीय अपराध असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. परिसरात अंमली पदार्थांबाबत कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास पालक, शिक्षक किंवा पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या बातमीदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही सांगण्यात आले.
या अभियानाला लोकप्रतिनिधी तथा माजी जिल्हा परिषद सदस्य माजरी प्रवीण सूर यांची उपस्थिती होती. तसेच कार्मेल अकॅडमीचे मुख्याध्यापक बोनीश जोश, कर्मवीर विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चौके, हिंदी महावीर विद्यालयाचे मुख्याध्यापक ब्रिजेश चव्हाण, केंद्रीय विद्यालय कुचनाचे मुख्याध्यापक मनोज यादव उपस्थित होते.
पोलीस स्टेशन माजरीचे ठाणेदार सुबोध वंजारी, HC हरिश्चंद्र देऊलकर (ब.क्र. २१५१), PC प्रमोद मिलमिले (ब.क्र. ९३४), PC सोहन गुरनुले (ब.क्र. २१५४) आणि म.पो. अंम. समीक्षा प्रधान (ब.क्र. २१३३) यांनी अभियानात सहभाग घेतला.
“नशामुक्त युवा – सुरक्षित समाज” हा संदेश देत विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांपासून स्वतः दूर राहण्याची आणि इतरांनाही व्यसनापासून दूर ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली.
0 comments:
Post a Comment