अवैध रेती वाहतुकीवर LCBचा दणका; ४०.६० लाखांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर : अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गुरुवारी (दि. २० ऑगस्ट) धडक कारवाई करत तब्बल ४० लाख रुपये किमतीचा १६ चाकी पल्ला ट्रक आणि १२ ब्रास रेती असा एकूण ४० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. LCB crackdown on illegal sand transportation; Goods worth Rs 40.60 lakh seized
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून महेंद्र कंपनीचा १६ चाकी पल्ला ट्रक क्रमांक MH 40 CT 4133 ताब्यात घेतला. या वाहनाची अंदाजे किंमत ४० लाख रुपये असून, त्यामध्ये सुमारे १२ ब्रास रेती, किंमत ६० हजार रुपये, आढळून आली.
या प्रकरणी चालक शरद पुंजराम शेंद्रे (वय ३९, रा. तादेगाव ठाकूर, ता. तिवसा, जि. अमरावती) आणि सिद्धार्थ विनायकराव गडलिंग (वय ३३, रा. परतोडा, ता. आर्वी, जि. वर्धा) यांच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात कलम 303(2), बीएनएस तसेच जमीन महसूल कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणातील वाहनमालक समरजीत दर्शनसिंग गरेवाल (रा. गुरुकुंज मोजरी, ता. तिवसा, जि. अमरावती) हा पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ही कारवाई उपविभाग राजुरा पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या पथकाने केली. अवैध रेती वाहतुकीविरोधात झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
0 comments:
Post a Comment