Ads

वरोऱ्यात पिस्तूल व १० जिवंत काडतुसे जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई


वरोरा जावेद शेख : नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने वरोरा शहरात धडाकेबाज कारवाई करत एका इसमाला पिस्तूल व १० जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्ह्याचा डाव उधळला गेल्याचे पोलिसांनी सांगितले.Pistol and 10 live cartridges seized in Varora; Local Crime Branch takes swift action

दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर वरोरा डिव्हिजनमध्ये पेट्रोलिंग करीत होते. यावेळी सत्यम टॉकीजच्या मागील वड्डार वस्ती परिसरात राहणारा संघपाल उर्फ संग्राम वासुदेव लभाने (वय ४६) हा गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असून त्याने आपल्या घरात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वड्डार वस्तीतील लभाने याच्या घरी छापा टाकून घरझडती घेतली. या झडतीमध्ये एक पिस्तूल, दोन मॅग्झीन आणि १० जिवंत काडतुसे अवैधरित्या आढळून आली. पोलिसांनी अग्निशस्त्रासह आरोपीचा मोबाईल असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अपराध क्र. ९०२/२०२६, कलम ३ व २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी वरोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिपक कांक्रेडवार, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीकडून पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केल्याने वरोरा परिसरात खळबळ उडाली असून, आरोपीचा आणखी कोणत्या गुन्ह्यांशी संबंध आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment