चंद्रपूर : राजकारणातील महत्त्वाचा दुवा असलेली आजची ‘Gen Z’ युवकांची पिढी आता राजकीय आणि सामाजिक प्रश्नांबाबत अधिक जागरूक होत आहे. युवकांच्या या ऊर्जेला संघटित करून त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने चंद्रपुरातील युवासेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या वतीने रविवारी, १६ ऑगस्ट रोजी सीडीसीसी बँक सभागृहात ‘Gen Z’ युवकांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.Historic entry of ‘Gen Z’ youth into Yuva Sena in Chandrapur
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी युवासेना विस्तारक संदीप रियाल पटेल होते. यावेळी माजी नगरसेवक व शिवसेना महानगरप्रमुख सुरेश पचारे, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख तथा चंद्रपूर-गडचिरोली संपर्कप्रमुख राजेश नायडू, युवासेना सहसचिव व युवती सेना जिल्हाधिकारी रोहिणीताई पाटील, माजी तालुकाप्रमुख प्रकाश खनके, शिवसेनेच्या माजी जिल्हा संघटिका कुसुमताई उदार तसेच युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
*चंद्रपुरात ‘Gen Z’ युवकांचा युवासेनेत ऐतिहासिक पक्षप्रवेश*
उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी सांगितले की, शिवसेना हा मराठी अस्मितेसाठी लढणारा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा पक्ष आहे. सत्ता असो अथवा नसो, जनतेच्या प्रश्नांसाठी लढणे हीच शिवसेना व युवासेनेची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
‘Gen Z’ युवक मोठ्या संख्येने पक्षात प्रवेश करत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत सहारे म्हणाले की, पक्षात प्रवेश केल्यानंतर कोणत्याही युवकाने स्वतःला एकटे समजू नये. युवासेना आणि शिवसेना हे एका कुटुंबाप्रमाणे असून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी संघटना ताकदीने उभी राहील.
परिसरातील समस्या सोडविण्यासाठी खचून न जाता त्यावर मार्ग शोधण्याचे आवाहन त्यांनी युवकांना केले. “प्रत्येक युवक स्वतः एक नेतृत्व आहे. समस्या सुटत नसतील तर तुमचा हा भाऊ विक्रांत सहारे आणि संपूर्ण युवासेना तुमच्या पाठीशी ताकदीने उभी आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*सत्ताधाऱ्यांवर संदीप रियाल पटेल यांची टीका*
युवासेना विस्तारक संदीप रियाल पटेल यांनी आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. शिवसेना जाती-पातीमध्ये भेद करणारा पक्ष नसून सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन चालणारी संघटना असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड महामारीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेची कुटुंबाप्रमाणे काळजी घेतल्याचे त्यांनी नमूद केले. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर बोलताना या आंदोलनाला शिवसेनेने सर्वप्रथम पाठिंबा दिल्याचा दावा करत तरुणांच्या प्रश्नांसाठी पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी असल्याचे पटेल यांनी सांगितले.
चंद्रपुरातील या भव्य पक्षप्रवेशाचे श्रेय त्यांनी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वाला दिले. नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलने करून सत्ताधाऱ्यांना जागे करण्याचे काम सहारे करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षफुटीच्या काळातही निष्ठा कायम ठेवणाऱ्या कुसुमताई उदार यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे पटेल यांनी नमूद केले.
*युवकांना जबाबदाऱ्या; संघटन विस्ताराला वेग*
मान्यवरांच्या हस्ते ‘Gen Z’ युवकांना भगवा धागा बांधून युवासेनेत अधिकृत प्रवेश देण्यात आला. यावेळी पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांवर विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.
यामध्ये महेश श्रीगिरीवार — युवासेना उपजिल्हाप्रमुख, बल्लारशा विधानसभा; सोहेल नौशाद खान — विधानसभा समन्वयक, बल्लारशा; सागर गबने — युवासेना तालुकाप्रमुख, चंद्रपूर; फरदिन सय्यद — शहरप्रमुख, चंद्रपूर; पवन ऊकडे — तालुका समन्वयक, चंद्रपूर; निखिल मेकेलवार — शहरप्रमुख, बल्लारशा यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी उपस्थित युवक, पदाधिकारी व मान्यवरांचे आभार मानले.
यावेळी पवन भाऊ नगराळे, बंटी कमटम, विपीन कोंगरे, अंकुश वाढंरे, नीरज यादव, अमित मालेकर, स्वप्निल पाटील, प्रशांत गड्डाला, सोनू श्रीनिवास, गौरव नाडमवर, केतन दयालवार, श्रीकांत दडमल, सागर धनकसर, हंसराज खरोले, अनिकेत भरने, चेतन बोबडे, जय हिकरे, हर्षल खनके, सार्थक शिर्के, प्रविण पेटकर, अक्षय शिरसाट, पराग कुत्तरमारे, रितिक रायपुरे, अंशु रायपुरे यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment