Ads

स्वातंत्र्य दिनी Dry Day चा भंग; भद्रावती पोलिसांचा दारू तस्करावर दणका

भद्रावती जावेद शेख, दि. १५ : स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण राज्यात Dry Day असताना अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्याविरुद्ध भद्रावती पोलिसांनी धडक कारवाई केली. शास्त्रीनगर परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत ‘रॉकेट संत्रा’ देशी दारूच्या तब्बल ३० पेट्या आणि दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली डिझायर कार असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.Violation of Dry Day on Independence Day; Bhadravati police bust liquor smuggler

भद्रावती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी DYSP सचिन खेत्रे आणि पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक परिसरात पेट्रोलिंग करीत होते. याचदरम्यान शास्त्रीनगर परिसरात अवैध देशी दारूचा साठा व वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी शास्त्रीनगर परिसरात सापळा रचला. यावेळी पांढऱ्या रंगाची डिझायर कार क्र. MH-34-CR-1706 संशयास्पदरीत्या आढळून आली. पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन झडती घेतली असता कारमध्ये ‘रॉकेट संत्रा’ देशी दारूच्या ३० पेट्या आढळून आल्या.

दारूची किंमत १.२० लाख; वाहनाची किंमत ५ लाख

पोलिसांनी जप्त केलेल्या देशी दारूची किंमत १ लाख २० हजार रुपये असून दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या डिझायर कारची अंदाजे किंमत ५ लाख रुपये आहे. त्यामुळे या कारवाईत पोलिसांनी एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

पुरवठादाराचा शोध सुरू

या प्रकरणी आदित्य धनराज कांबळे, रा. मांगली, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर याच्याविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ७७६/२०२६, कलम ६५(e) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपीने ही दारू कोणाच्या सांगण्यावरून आणली, दारूचा पुरवठा नेमका कोठून करण्यात आला, तसेच या अवैध दारू वाहतुकीच्या मागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत. त्यामुळे या कारवाईतून अवैध दारू पुरवठ्याची साखळी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे कारवाई

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर Dry Day असल्याने अवैध दारूची विक्री व वाहतूक रोखण्यासाठी भद्रावती पोलिसांकडून विशेष गस्त घालण्यात येत होती. याच गस्तीच्या वेळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेते व वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.

या पथकाची कामगिरी

ही कारवाई DYSP सचिन खेत्रे व पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वाखाली API संजय मिश्रा, पोलीस कॉन्स्टेबल धीरज क्र. १३०५, प्रेम क्र. ८१६, योगेश क्र. १९३२, किरण क्र. ८६४ आणि नितीन आमटे क्र. १२१० यांनी केली.

जप्त मुद्देमाल :
३० पेट्या देशी दारू – ₹१,२०,०००
डिझायर कार – ₹५,००,०००
एकूण – ₹६,२०,०००

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी Dry Day चा भंग करून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे भद्रावती पोलिसांची सतर्कता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment