Ads

वरोऱ्यात पिस्टलसह आरोपी जेरबंद; नातेवाईक दाम्पत्याचा शोध सुरू

वरोरा जावेद शेख  : वरोरा शहरात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमाला स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि वरोरा पोलिसांच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई करत अटक केली. संतोष दादाजी सेलोकार (वय ४८, रा. मित्र चौक, वरोरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून मॅग्झीनसह एक पिस्टल असा सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.Accused arrested with pistol in Varora; Search underway for relative couple

दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि वरोरा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक वरोरा शहरात पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. मित्र चौक परिसरातील संतोष सेलोकार याने आपल्या राहत्या घरी विनापरवाना अग्निशस्त्र बाळगल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याच्या घरी धाड टाकली.

घराची झडती घेतली असता मॅग्झीनसह एक पिस्टल विनापरवाना आढळून आले. पोलिसांनी सदर अग्निशस्त्र जप्त करून आरोपी संतोष सेलोकार याला ताब्यात घेतले.

दरम्यान, हे पिस्टल कुठून आणले, याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने मित्र चौक, वरोरा येथील त्याचा नातेवाईक देवा नौकरकार आणि त्याची पत्नी सौ. भाग्यश्री देवा नौकरकार यांनी आपल्या घरी सदर अग्निशस्त्र आणून दिल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, सपोनि चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व वरोरा पोलिसांच्या पथकाने केली.

पोलिसांच्या या कारवाईमुळे वरोरा शहरात अवैधरित्या अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, या पिस्टलचा नेमका वापर अथवा पुरवठा साखळी काय आहे, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment