भद्रावती.तालुका प्रतिनिधी:-
भद्रावती शहरातील हनुमान नगर येथील पंचवीस वर्षीय युवकाने आपल्या रहा त्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.suicide
Twenty-five-year-old youth commits suicide by hanging himself
सदर घटना दिनांक रोज शनिवारला दुपारी चार वाजताच्या दरम्यान शहरातील हनुमान नगर येथे घडली.आकाश विलास सातपुते वय २५वर्ष राहणार हनुमान नगर, भद्रावती असे मृतक युवकाचे नाव आहे.सदर मृतक हा मोल मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करीत होता.तो व्यसनाच्या आहारी गेला होता.अशातच त्याची पत्निही त्याच्या व्यसनाच्या त्रासामुळे त्याला सोडून गेली होती अशी माहिती समजते.या नैराश्यातूनच त्याने दुपारच्या वेळी आपल्या घरातच दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपविली असावी असा अंदाज परिसरात व्यक्त केला जात आहे. सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना Bhadravati Police प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती कार्यवाही करुन शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
0 comments:
Post a Comment