Ads

वाघाच्या हल्ल्यात 50 वर्षीय महिला ठार

नागभीड : tiger Newsनागभीड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पहारनी बिटातील गावापासून 2 किमी अंतरावर असलेल्या जंगलालगतच्या शेतात काम करायला गेलेली मृतक सुमित्रा वासुदेव कुंबरे वय (50) शेतात गवत कापत असणाऱ्या सदर महिलेवर सायंकाळी 5.00 वाजताच्या सुमारास वाघाच्या बछड्यांनी हल्ला करून महिलेला ठार केल्याची घटना दि.26 नोव्हेंबर 2022 रोजी उघडकीस आली. महिला घरी परत न आल्यामुळे तिच्या शोधाशोध घेतले असता महिलेचा मृतदेह हा शेतातच आढळून आला. मात्र यावेळेस शोधायला गेलेल्या लोकांवर मृतदेहाजवळ असलेल्या वाघाच्या 2 बछड्याने हल्ला चालवण्याची घटना सुद्धा घडली.Attacked by 2 tiger cubs
50-year-old woman killed in tiger attack
नागभीड वनपरिक्षेत्रातील हुमा (खडकी) चे वनरक्षक बुरले यांच्या आईला सुद्धा या वाघाच्या बछड्यानी तोरगाव मधील त्यांच्या शेतात जखमी केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडलेली होती. प्रत्यक्षदर्शीनुसार महिलेला हल्ला करून ठार मारणाऱ्या मध्ये तेच वाघाचे दोन बछडे असल्याची चर्चा आहे. तरी यामुळे परिसरात सध्या शेतीचा हंगाम सुरु असल्यामुळे व धान कापणी याकरिता शेतकऱ्यांना शेताचे काम करायला जंगलात असलेल्या शेतामध्ये जावे लागते त्यामुळे लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरलेले आहे. तरी वनविभागाने या वाघांचा बंदोबस्त करावा असे परिसरातील लोकांनी मागणी केलेली
आहे.

वृत्त लिहीपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीड ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले. मोक्याच्या ठिकाणी कॅमेरे लावून परिसरात वनविभागाने ग्रस्त वाढविलेली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment