Ads

सिंदेवाही तहसील कार्यालय, पंचायत समिती , तसेच विविध शासकीय कार्यालय येथे संविधान दिन साजरा

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही- तहसील कार्यालय सिंदेवाही येथे आज शनिवार दि. ‍26 नोव्हेंबर 2022 ला संविधान दिन साजरा करण्यात आला .
Constitution Day celebrated at Sindewahi Tehsil Office, Panchayat Samiti and various government offices
या कार्यक्रमाची सुरुवात संवीधानाच्या प्रतिमेला माल्यार्पन संवीधान वाचन करुन झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंदेवाही तहसीलदार गणेश जगदाळे नायब तहसीलदार तोडकर, धात्रक तसेच सिंदेवाही तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व शिपाई उपस्थित होते. तसेच
पंचायत समिती सभागृह सिंदेवाही येथे भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डा .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख अतिथींच्या हस्ते माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून संविधान दिन पंचायत समिती सभागृह सिंदेवाही येथे नुकताच साजरा करण्यात आला .
याप्रसंगी भारतीय संविधानाचे महत्व व डा .बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आदी विविध विषयावर कार्यक्रमाचे अतिथी पशुधन विकास अधिकारी डा.विनोद सुरपाम ,कक्ष अधिकारी मंगलदास मेश्राम व शिक्षणतज्ज्ञ भारत मेश्राम यांनी मार्गदर्शन केले .
तत्पूर्वी ,पंचायय विस्तार अधिकारी अमित महाजनवार यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले .या कार्यक्रमाचे संचालन अधीक्षक अगडे यांनी केले .तर मनोज अलोणे यांनी आभार मानले .या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या विविध विभागातील बहुसंख्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment