घुग्घुस : Mumbai terror attack शहर काँग्रेस तर्फे 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना तसेच या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना जनसंपर्क कार्यालय प्रांगणात सांयकाळी सहा वाजता मेणबत्ती व पुष्प वाहून भावपूर्ण आदरांजली अर्पित करण्यात आली.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई Mumbai येथील हॉटेल ताज, नरीमन पॉईंट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला यात अनेक निरपराध विदेशी पाहुणे व देशी नागरिकांचे जीव गेले या दहशतवाद्यांशी झुंज देत असतांना दहशतवादी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामठे,विजय साळसकर, तुकाराम ओबाळे मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या सह अनेक जवान देशाखातर लढताना शहीद झाले या शूरवीरांना आदरांजली अर्पित करण्यात आली याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, सैय्यद अनवर,शामराव बोबडे,रोशन दंतलवार, दीपक पेंदोर,साहिल सैय्यद,सुनील पाटील, हर्ष कांबळे,सन्नी कुममरवार, विक्की जंगम, रोशन आवळे, इस्त्याक खान,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment