रेती तस्करीला LCB चा दणका!


भद्रावती | प्रतिनिधी जावेद शेख

चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा उगारला असून, भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून रेतीची चोरटी वाहतूक करणारा टाटा हाफटन टिप्पर पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत दोन ब्रास रेतीसह एकूण २० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.LCB cracks down on sand smuggling!

दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाला भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित परिसरात नाकाबंदी करून कारवाई केली. यावेळी रेतीची अवैध वाहतूक करणारा टाटा हाफटन टिप्पर (क्रमांक MH 34 BZ 9750) ताब्यात घेण्यात आला.

या कारवाईत ऋषिकेश बंडू गोरे (वय २९, रा. खापरी वॉर्ड, शारदा माता मंदिर परिसर, भद्रावती, जि. चंद्रपूर) याच्याविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात अप. क्र. १०७६/२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच जमीन महसूल अधिनियमाच्या कलम ४८(७), ४८(८) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :

  • टाटा हाफटन टिप्पर (MH 34 BZ 9750) – अंदाजे २० लाख रुपये.
  • दोन ब्रास रेती – अंदाजे १० हजार रुपये.

अशा प्रकारे एकूण २० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या उपविभाग राजुरा पथकाने केली. जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे रेती तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

— दि चंद्रपूर टाइम्स

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment