जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती :-
सुशील आडे सर (तालुका कृषी अधिकारी, भद्रावती) यांच्या मार्गदर्शनात रानभाजी महोत्सव राबविण्यात आला. शहरी लोकांना रानभाज्यांचे महत्त्व, पौष्टिकता तसेच त्यातून मिळणाऱ्या आर्थिक संधींबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोज शुक्रवारला मौजा - मोहर्ली येथे येथे तालुका स्तरीय रानभाजी महोत्सव चे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय परिसर मोहर्ली येथे करण्यात आले.
Wild Vegetable Festival organized at Mohali under the Agriculture Department of the Government of Maharashtra and the Agricultural Technology Management System (ATMA)
या महोत्सवात तालुक्यातील आत्मा नोंदणी गट, कृषी सखी, कृषी ताई व पाणी फाउंडेशन च्या महिला शेतकरी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून स्टॉल ची उभारणी केले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. सौ. सुनिता कातकर मॅडम, सरपंच मोहर्ली, मा. कु. कविता हरिणखेडे मॅडम (उपविभागीय कृषी अधिकारी , वरोरा), मा. श्री. सदाशिव अवगान साहेब (RFO मोहर्ली कोअर), मा.श्री.संतोष थिपे साहेब (RFO मोहर्ली बफर), मा. श्री. शामल नन्नावरे साहेब, सरपंच भामडेळी यांच्या हस्ते करण्यात आले. मा. श्री. आडे सर यांनी रानभाज्या पावसाळ्यात उपलब्ध होऊन कशा पद्धतीने पोषक असतात व कुठल्या रानभाज्या आपल्या आरोग्याला फायदेकारक आहेत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले , मा. कु. कविता हरिणखेडे मॅडम यांनी दैनंदिन जीवनात रानभाज्या चे महत्व पटवून दिले, श्री. सदाशिव अवगान साहेब (RFO मोहर्ली कोअर), श्री.संतोष थिपे साहेब (RFO मोहर्ली बफर) यांनी कुठल्या रानभाज्या आपल्या आरोग्याला फायदेकारक आहेत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. सदर स्टॉलला सहभाग प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले . तसेच पिक स्पर्धा खरीप हंगाम 2025-26 धान पिकांमध्ये विक्रमी उत्पन्न घेऊन तालुक्यात प्रथम आलेले श्री. निळकंठ संबा मगरे रा. ठाणेगाव यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला श्री.विकास चवले सर ,म.कृ.अ. चंदनखेडा. उप कृषी अधिकारी सौ. मुक्ता ताजने मॅडम, सौ, हर्षल इंद्दे मॅडम, सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहायक, श्री.कपिल शंकपाळे साहेब, सहायक कृषी अधिकारी , मोहुर्ली यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात आले. सदर कार्यक्रमात सर्व तालुका कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. ए. डी. दहेगावकर, बी टी एम (आत्मा) यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. व्ही. बि. कवाडे साहेब, (उप कृषी अधिकारी) यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समूह सहाय्यक कु दिक्षा नारनवरे, प्रगतशील शेतकरी श्री प्रशांत गजभे, श्री आदित्य मगरे, श्री सुधिर भोयर, श्री अशोक घोडमारे यांनी मोलाचे सहकार्य केले..
0 comments:
Post a Comment