चंद्रपूर:- जटपुरा गेट परिसरात असलेल्या M4U या कपड्याच्या दुकानाला रात्री दहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयाचे कपडे जळून खाक झाले असून दुकान मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.
Terrible fire broke out in chandrapur
दिवाळी सणाच्या लगबगीत कापड व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात नवा स्टॉक आणला होता, दिवाळी सणानंतर ही नागरिक कपडे घ्यायला गर्दी करीत आहे.
वसंत भवन मध्ये असलेल्या M4U या दुकानात सदर आग कशी लागली याबाबत अजून काही कारण स्पष्ट झाले नाही.
जर आगीने रौद्र रूप धारण केले असते तर अनेक दुकाने यामध्ये खाक झाली असती.
अग्निशमन दलाने वेळेवर पोहचत सदर आगीवर नियंत्रण मिळविले.
0 comments:
Post a Comment