जावेद शेख तालुका प्रतिनिधी :
तालुक्याती सांसद आदर्श ग्राम पंचायत चंदनखेडा येथे जिल्हा परिषद चंद्रपूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. विवेक जॉन्सन यांनी भेट देऊन विविध कामाची पाहणी केली .Meeting of Chief Executive Officer at Chandankheda
सांसद आदर्श ग्राम ग्राम पंचायत चंदनखेडा येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या विविध उपक्रमा अंतर्गत केलेल्या काम ची पाहणी केली त्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गांडूळ खत प्रकल्पाची पाहणी केले तसेच प्लस्टिक संकलन केंद्र, मनरेगा अंतर्गत केलेल्या स्मशान भूमीत केलेल्या वृक्ष लागवड, वाचनालय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली व सूचना दिल्या या वेळी सरपंच श्री नयन बाबाराव जांभुळे, गटविकास अधिकारी मा. डॉ. मंगेश अरेवार, सहाययक अधिकारी श्री बोबडे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आसुटकर, ग्राम विकास अधिकारी श्री किशोर नाईकवार , ग्रामपंचायत चे उपसरपंच तसेच सर्व सदस्य गन व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते......
0 comments:
Post a Comment