भद्रावती तालुका प्रतिनिधी :
भद्रावती शहरातील श्रीकृष्ण नगर येथील एका मनोरुगण युवकाने परिसरात उभ्या असलेल्या तिन वाहणांच्या काचा फोडल्या.यात गाडिमालकांचे जवळपास पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.सदर घटना दिनांक १६रोज बुधवारला दुपारच्या वेळेस घडली.
The mentally ill youth broke the windows of three vehicles.
सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आली असुन पोलिसांनी घटनेतील आरोपी रोहित प्रभाकर लिपटे राहणार श्रीकृष्ण नगर भद्रावती याचेविरोधात गुन्हा दाखल केला असुन वृत्त लिहेपर्यंत आरोपीला अटक करण्यात आली नव्हती.दरम्यान भद्रावती पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.आरोपी युवक हा थोडासा मनोरुगण असल्याचे समजते.शहरातील श्रीकृष्ण नगर परिसरातील एका खासगी आयटीआय जवळ दोन स्कुलबस तथा एक जिपकार ऊभी होती.यावेळी हा युवक तेथे बसुन होता.अचानक या युवकाने काहिही कारण नसतांना या वाहणांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. कोणाला काही कळायच्या आत या युवकाने वाहणांच्या काचा फोडून जवळपास पन्नास हजार रुपयांचे नुकसान केले.
0 comments:
Post a Comment