चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून रेती घाट बंद असताना व रेतीची उचल बंद असताना सुध्दा नागपूर रोडवरील मोरवा ते शनिमंदिरा पासून 200 मीटर दूर मोठया प्रमाणावर अवैध रेती साठा केलेला आढळून येत आहे. सदर मार्गावर अवैध रेती साठा असताना सुध्दा याकडे शासकीय किंवा आधिकारिक विभागाचे कसे लक्ष गेले नाही याबद्दल कमालीचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सदर Illegal sand stock अवैध रेती साठा राजकीय पुढाऱ्याचे असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. या अवैध रेती साठ्यावर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
About 300 brass sand stock on Shani Mandir route with whose blessing?
मिळालेल्या माहितीनुसार रेती घाट बंद असताना संबंधित विभागाकडे ट्रॉझिट पास (टीपी)TP जमा करावी लागते आणि त्यानंतर रेतीघाटावरून रेतीची उपसा बंद करण्यात येत असतो, असे असताना सुद्धा मोरवा जे शनिमंदिरापर्यंत मोठया प्रमाणावर अवैध रेती साठा करण्यात आलेला आहे.
अवैध रेती साठा करून ठेवण्यात आलेला असून ह्या रेतीची परस्पर विक्री करत असून मोठ्या प्रमाणावर मलिदा लाटण्यात येते आहे, असागोरखधंदा कित्येक दिवसांपासून सुरू आहे. परंतु सदर प्रकाराकडे गांभीर्याने कोणीही लक्ष देत नसल्याचे दिसून येते. मोरवा ते शनिमंदिरा मधील मार्गावर मोठमोठे रेतीचे ढिगारे करून 300 ब्रास साठा केल्याचे प्रत्यक्षदर्शनी दिसून येते.
नागपूर मार्गावर मोठया प्रमाणावर ट्रॅव्हल्सची वाहतूक सुरु असते. शासकीय अधिकाऱ्यांची व मंत्रयाची वाहने धावते असतात पण सदर उवैध रेती साठयाकडे कोणाचेच का लक्ष गेले नाही हा संशोधनाचा विषय ठरत आहे.
दुसरीकडे एखाध ट्रैक्टर रेती वाहतूक करताना महसूल विभागाचे अधिकारी ट्रैकर पकडून चालान करतात व वृतपत्रांना बातमी पाठवून स्वत:ची प्रशंसा करून घेतात. परंतु मोठ्या प्रमाणावर अवैध रेती साठा असताना त्याची साधी विचारपूस करून कारवाई का करण्यात येत नाही असा प्रश्न चर्चिला जात आहे.
गोपनीय माहितीनुसार शनि मंदिर ते मोरवा पर्यंच्या भागात अवैध रेतीच्या साठ्याचा कर्ताधर्ता राजकीय पुढारी असलाचे समजते.
रेतीचा उपसा बंद असताना व टीपी बुक राजस्व विभागाकडे जमा करण्याचे नियम असताना देखील अवैध रेती परस्परपणे विकण्याची परवानगी कोणी दिल्ली आहे.
अवैधपणे रेतीचा साठा करणे, परस्पर रेती विक्री करणे आदि बाकी नियमबाहय असताना हा सर्रास प्रकार राजस्व विभागाच्या डोळ्यात धूळ टाकून करण्यात येत आहे. या रेती साठयावर अविलंब कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment