उर्जानगर /चंद्रपुर : भारतीय जनता पार्टी चंद्रपूर, समता स्पोर्टिंग क्लब, चंद्रपूर, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, उर्जानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मान.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक व मत्सव्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा यांच्या मार्गदर्शनात व श्री.गजानन पांडे यांच्या संयोजनात पालकमंत्री चषक विदर्भ राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धचे आयोजन खुले रंगमंच,उर्जानगर येथे दिनांक १९/११/२०२२ ते २१/११/२०२२ पर्यंत करण्यात आले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक एकलव्य क्रिडा मंडळ,नागपूर यांचा तर दुसरा क्रमांक ओमअमर क्रिडा मंडळ, नागपूर यांचा आला या दोन्ही संघाला प्रथम बक्षीस रू.७१०००/- रोख व ट्रॉफी आणि दुसरे बक्षीस ४१०००/- रोख व ट्रॉफी तसेच सर्वोत्तम खेडाळू अभिषेक निंबाळकर,उत्कृष्ट पकड राहुल कांबळे,उत्कृष्ट चढाई आयुष राठोड यांना प्रत्यकी रू.७०००/- रोख व सन्मान चिन्ह भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.देवराव भोंगळे, आणि चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष मा. मंगेश गुलवाडे यांचे हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमाला बल्हारपुर न.प.चे माजी नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा,उपाध्यक्ष भाजपा रामपाल,महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष वसंत काळे, माजी जी.प. सदस्य श्री.विलास टेभुर्णे, भाजपा तालुका जिल्हाध्यक्ष हनुमान काकडे, माजी महिला व बाल कल्याण सभापती सौ.रोशनी खान, माजी जी. प सदस्या सौ. वनिता आसुटकर, माजी पंचायत समिती सभापती सौ.केमा रायपूरे, माजी प स सभापती श्री.संजय यादव, ग्रा. प. ऊर्जानगर सरपंच सौ. मंजुषा येरगुडे, समता स्पोर्टिंग क्लब कोषाध्यक्ष कुमार पेंजला,ग्रा. प. ऊर्जानगर माजी सरपंच सौ. मुक्ता येरगुडे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती
कार्यक्रमाचे सुरवातीस भारतमाता व पवनसुत हनुमान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यानंतर सर्व पाहुण्यांचा सत्कार आयोजकांचे हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.श्री. देवराव भोंगळे, श्री.हरीश शर्मा, व श्री. रामपाल सिंग यांनी खेळाडूंना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.Guardian Minister Cup Kabaddi Tournament
या कब्बडी चषकाचे आयोजन आयोजक श्री.गजानन पांडे ,श्री. रविंद्र गुरनुले, श्री.संजय कातकर, श्री.मनोज मानकर यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रविंद्र गुरनुले, अध्यक्ष, समता स्पोर्टिंग क्लब यांनी तर सूत्रसंचालन भाजपा अनुसुचित जाती मॉर्च्याचे जिल्हाध्यक्ष श्री. धनराज कोवे यांनी केले.
0 comments:
Post a Comment