Ads

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन वाघांचा मृत्यू ..

चंद्रपूर :- जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन वाघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.Two tigers die in Tadoba Andhari Tiger Reserve
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रामध्ये मोहर्ली वनपरिक्षेत्रात आगरझरी येथील कक्ष क्रमांक १८९ मध्ये अंदाजे ६-७ महिन्याचे वाघाचे शावक (मादी) दिनांक ०१/१२/२०२२ रोजी मृत अवस्थेत आढळूल आले. सदरहू मादी शावक हे T६० वाघिणीचे असल्याचे दिसून येते. सदरहू बातमी कळताच श्री. बापू येळे, सहाय्यक वनसंरक्षक, श्री. संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली, डॉ. कुंदन पोडचलवार, पशुवैदयकीय अधिकारी, डॉ. संजय बावणे, पशुवैदयकीय अधिकारी, श्री. बंडू धोत्रे, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण यांचे प्रतिनिधी, श्री. मुकेश भांदककर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी यांनी घटनास्थळी भेट देवून मृत वाघ शावकाची (मादी) पाहणी केली व मृत शावकाला वैदयकीय तपासणी तसेच शवविच्छेदनासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे आणण्यात आले व डॉ. जितेंद्र रामगावकर, क्षेत्रसंचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांचे उपस्थितीत शवविच्छेदन करुन आवश्यक नमूने तपासणी करीता घेण्यात आले. सदरहू शावकाचा मृत्यू ईतर नर वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे शरीरावरील खुणा व घटनास्थळावरील परिस्थितीवरुन दिसून येत आहे. त्यानुसार घटनास्थळावर पुढील निगराणी व ईतर आवश्यक कार्यवाही श्री. कुशाग्र पाठक, उपसंचालक (बफर) यांचे मार्गदर्शनात श्री. संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली करीत आहे.
वाघाचे शावक मृत अवस्थेत आढळली.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर विभागातील शिवणी वनपरिक्षेत्रामधील वासेरा नियतक्षेत्रालगत असलेल्या महसूल विभागातील गट क्रमांक १८५ मध्ये बिट वनरक्षक वासेरा व बिट मदतनिस हे दिनांक ३०/११/२०२२ रोजी गस्त करीत असतांना त्यांना दुपारी ०३:०० वाजताच्या सुमारास वाघिण (T७५) मृत अवस्थेत आढळून आली. सदरहू बातमी कळताच श्री. कुशाग्र पाठक, उपसंचालक (बफर) व डॉ.कुंदन पोडचलवार, पशुवैदयकीय अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली तसेच सदरहू घटनेचा मौका - स्थळ पंचनामा करण्यात आला. मृत वाघिणीचे अंदाजे वय १४-१५ वर्षे होते. सदरहू वाघिणीचा मृत्यू हा वयोवृध्द असल्यामुळे नैसर्गिकरित्या झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तसेच मृत वाघिणीचे अंतर्गत अवयव व कातडी संपूर्णत: कुजलेल्या स्थितीत आढळून आली असून दात व नखे, ईत्यादी अवयव शाबूत स्थितीत आढळून आले. सदरहू प्रकरणी शिकार वा घातापाताचा प्रकार घडला नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

दिनांक ०१/१२/२०२२ रोजी श्री. कुशाग्र पाठक, उपसंचालक (बफर), डॉ. कुंदन पोडचलवार, पशुवैदयकीय अधिकारी, डॉ. सुरपाम, पशुवैदयकीय अधिकारी, पंचायत समिती, सिंदेवाही, श्री. बंडू धोत्रे, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण यांचे प्रतिनिधी, श्री. मुकेश भांदककर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी, श्री. विवेक करंबेळकर, मानद वन्यजीव रक्षक, चंद्रपूर जिल्हा यांनी घटनास्थळी भेट देवून मृत वाघिणीची पाहणी केली तसेच वैदयकीय तपासणी केली. त्यानंतर शवविच्छेदन करुन शवाचे दहन करण्यात आले. त्यानुसार घटनास्थळावर श्वान पथकाद्वारे तपास, पुढील निगराणी व ईतर आवश्यक कार्यवाही श्री. कुशाग्र पाठक, उपसंचालक (बफर) यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी शिवणी करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment