Ads

भार्गवी लॅन्ड डेव्हलपर्स प्रा.लि. कंपनीने प्लॉट धारकांची ४१ लाख ५० हजारने केली फसवनुक

चंद्रपूर :- एकदा पैसे जमा करा व दर महिन्याला मिळवा आकर्षक व्याजासाहित रक्कम,अश्या मोठमोठ्या आकर्षक आमिषाला नागरिक अनेकदा बळी पडले आहे, मात्र आजही अनेक नागरिक अश्याया आमिषाला बळी पडतच आहे.
Bhargavi Land Developers Pvt. Ltd.The company cheated the plot holders for 41 lakh 50 thousand
असाच एक प्रकार चंद्रपुर येथील दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आला आहे.भरत नानाजी धोटे वय ३८ वर्ष रा. धांडे हॉस्पीटल समोर, टोंगे यांचे घरी तुकुम चंद्रपुर यांनी भार्गवी लॅन्ड अॅन्ड डेव्हलपर्स या नावाने खाजगी कंपनी मर्यादीत स्थापन करून, अभिकर्ते (एजन्ट ) यांचे मार्फतीने मौजा पद्मापुर पटवारी अभिलेखानुसार भुमापन क्रमांक १२३/०१(क), १२३/०१(ड), १२३/०१(इ) वरील जागेवर १००० चौ. फुटचा प्लॉट किमत २,५०,०००/ रु. मध्ये ३० महीण्याकरीता भाडेतत्वावर यूनीवर्स अॅग्रो टुरीझम प्रा. ली. चे नावाने करार करून त्या प्लॉटवर कुटयाचे बांधकाम करून व विकास करून टुरीस्ट लोकांना रिसोर्ट प्रमाणे किरायाने देवुन मिळणा-या उत्पन्नातुन प्रत्येक प्लॉट धारकास ७०८३/- रू. प्लॉट बुकींग नंतर ०१ महीण्यानी प्रत्येक महीण्याला प्लॉट धारकाचे बँक खात्यात ३० महीण्यापर्यत जमा करण्यात येतील व एप्रील, मे २०२२ पर्यत सर्व प्लॉट धारकांच्या नावाने वेगवेगळया रजीस्ट्री करून देण्यात येईल अशा प्रकारे आश्वासने देवुन प्रत्येक प्लॉट धारकाकडुन चेक, आरटीजीएस, गुगल पे, फोन पे तसेच नगदी स्वरूपात प्रत्येकी २,५०,०००/- रू. भरत नानाजी धोट यांनी स्विकारले व भार्गवी लॅन्ड अॅन्ड डेव्हलपर्स चे नावाने स्टॅम्प पेपरवर नोटरी करून विसारपत्र व यूनीवर्स ॲग्रो टुरीझम प्रा.ली. नावाने भरत नानाजी धोटे यांनी स्वतः करारनामा माहे जाने / फेब्रु २०२२ मध्ये करून दिला. काही प्लॉट धारकांना २-३ महीने ७०८३/- रु. प्रती / माह प्रमाणे त्यांचे खात्यात जमा करून ठरल्याप्रमाणे रक्कम जमा करणे बंद केले तसेच प्लॉट धारकांना ठरवुन दिलेल्या वेळेपर्यत रजीस्ट्री करून दिली नाही.

सदर प्रकरणी अशोक पांडुरंग भटवलकर वय ४५ वर्ष रा. म्हाडा कॉलनी दाताळा यांचे रिपोट वरून भरत नानाजी धोटे यांने भार्गवी लॅन्ड डेव्हलपर्स नावाने खाजगी कंपनी तयार करून तक्रारदार व इतर १५ लोकांकडुन ४१,५०,००० रूपयेची फसवनुक केल्याप्रकरणी पोलीस स्टेशन दुर्गापुर येथे अप क्र. २१८/२०२२ कलम ४२०,४०६,४६७,४६८ भादवी अन्वये दिनांक १९/१२/२०२२ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे मा. पोलीस अधिक्षक रविन्द्र सिंग परदेशी, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती रीना जनबंधु आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे ठाणेदार दुर्गापुर गुन्हयाचा पुढील तपास करीत आहे.

आरोपी भरत नानाजी धोटे यांनी भार्गवी लॅन्ड अॅन्ड डेव्हलपर्स चे नावाने कोणत्याही नागरीकांची वरील प्रमाणे फसवणुक केली असल्यास त्यांनी पोलीस स्टेशन दुर्गापुर येथे संपर्क करावा.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment