Ads

नानाजी नगर मधील दत्त मंदिराचा सुवर्ण महोत्सव

चंद्रपूर : शहरातील नागपूर रोडवर साईबाबा मंदिरच्या बाजूला असलेल्या नानाजी नगर मधिल सार्वजनिक दत्त मंदिराला यंदा ५० वर्षे पूर्ण झाले.सार्वजनिक दत्त मंदिरांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ७ डिसेंबर रोजी दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत दत्त जयंती तसेच रात्री 8.30 ते 10 पर्यंत भक्तीगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.Golden Jubilee of Datta Mandir in Nanaji Nagar
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे तसेच ८ डिसेंबर रोजी सांयकाळी आयोजीत महाप्रसादाचा लाभ घेण्याचे जाहीर निमंत्रण दत्त जयंती व महाप्रसाद आयोजन समितीचे अध्यक्ष हरिचंद्र येरगुडे, कार्याध्यक्ष पप्पू देशमुख, सचिव व्यंकटेश उपगन्लावार, कोषाध्यक्ष नंदकिशोर पाहुणे, भोजन व्यवस्थापन समातीचे दिलीप मेहता, अल्का लांडे, संगीता पाहुणे, मनिषा बोबडे, मनिषा गांवडे, शुंभागी गांवडे, पदमा चौहाण, जयश्री लांडे, वैशाली हिवरकर, आदींनी केले.
३५ देवांची मुर्तीस्थापना असलेले विदर्भातील एकमेव मंदिर
वडगाव येथील स्वर्गीय फकीराजी येरगुडे यांनी त्यांचे दिवंगत पुत्र स्वर्गीय नानाजी येरगुडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या मंदिराची उभारणी केली होती. शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक चुन्नीलालजी चव्हाण यांनी अनेक वर्षे अध्यक्ष म्हणून या सार्वजनिक दत्त मंदिराची जबाबदारी पार पाडली. सन २००० मध्ये शहरातील अन्य एक प्रतिष्ठित व्यावसायिक स्वर्गीय मुरलीधरराव उपगन्लावार यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जुन्या सार्वजनिक दत्त मंदिराचा जीर्णोद्धार केला. लोकसभागातून सन २००० ला या मंदिरामध्ये त्र्यंबकेश्वर नाशिकच्या धर्तीवर एकूण ३५ देवांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली. अशा प्रकारचे हे विदर्भातील एकमेव मंदिर असल्याचे प्रचलित आहे.
पप्पू देशमुख यांच्या संकल्पनेतून मंदिराचा कायापालट
२० हजार चौरस फुटाच्यावर मोकळी जागा असलेला हा मंदिर परिसर अनेक वर्षे दुर्लक्षित होता. परंतु नानाजी नगरचे मूळ रहिवासी असलेले माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत मनपाच्या निधीतून मंदिर परिसराचा संपूर्ण कायापालट केला. अवतीभवती असलेली मोठी वृक्षे व मोकळ्या परिसरामुळे मंदिर परिसराला पर्यटन स्थळाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.या ठिकाणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या निधीतून २५ लाख रुपये खर्च करून अभ्यासिका उभारण्यात आली. अभ्यासिकेचे बहुतांशी काम पूर्ण झालेले असून लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. व्यायाम शाळा, क्रीडांगण, सभागृह आदी सोयी सुविधांनी उपलब्ध श्रीदत्त क्रीडा व सांस्कृतिक केंद्र प्रकल्पाचा पहिल्या टप्प्याचे काम या ठिकाणी पूर्ण झाले असल्याची माहिती देशमुख यांनी दिलेली आहे.







Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment