चंद्रपुर: महापरिनिर्वाण दिना निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पूष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. तसचे यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयातही अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.Salute to Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar on behalf of Young Chanda Brigade on the occasion of Mahaparinirvana Day.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक बबलु मेश्राम, बहुजन आघाडी महिला शहर संघटिका विमल कातकर, भाविक पेटकर, वैशाली मेश्राम, अनिता झाडे, निलिमा वनकर, निलिमा कोरेकर, प्रतिक शिवणकर, विलास वनकर, सायली येरणे, माधुरी निवलकर, आदिंची उपस्थिती होती
महानरिनिर्वाण दिनानिमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गांधी चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन नमन करत अभिवादन करण्यात आले. तर यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयातही अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment