अहेरी:- समाजाच्या प्रगतीसाठी विखुरलेल्या घटकांना एका छताखाली आणून समाजाचे हित जोपासण्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.त्या मंगळवार रोजी आयोजित पेरमिली येथील दसरा पंडुम व गडी पूजा कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरून बोलत होत्या.यावेळी विशेष अतिथी म्हणून माजी आ दिपक आत्राम,प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प अध्यक्ष अजय कंकडालवार, पेरमिलीचे सरपंच किरण कोरेत,माजी प स सदस्य रामेश्वर बाबा आत्राम,गडी सेंडीया पेरमिली पट्टी संजय सडमेक,गडी भूमिया पेरमिली पट्टी बोड्डाजी गावडे,माजी सरपंच बालाजी गावडे तसेच पेरमिली पट्टीतील सर्व सरपंच तसेच पट्टीतील भूमिया,गायता,पेरमा,वड्डे मोठया संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना पारंपारिक पेरमीली इलाका पट्टीचा पेरमिली गडी पूजा व पेरमिली दसरा पंडूमचा कार्यक्रम दरवर्षीच साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा अजूनही कायम असून पारंपारिक पेरमीली इलाका पट्टीतील सर्व ग्रामसभांनी दसरा पंडूम निमित्त सर्वच पक्षातील मान्यवरांना मानाचे स्थान दिले आहे.अजूनही आपल्या समाजबांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.समाजाच्या अश्या कार्यक्रमात पक्ष बाजूला ठेवून सर्व मान्यवरांनी विविध समस्यांवर विचारमंथन केल्यास नक्कीच येथील समस्या सोडविता येणार आहे.त्यामुळे आपल्या आदिवासी समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तसेच समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही भाग्यश्री आत्राम यांनी केले.
पेरमिली येथील दोन दिवसीय कार्यक्रमात 6 डिसेंबर रोज मंगळवार ला दुपारी 4 वाजता गडी पूजा करण्यात आले. तर,सायंकाळी 7 वाजेपासून पारंपरिक आदिवासींचा रेला पाटा, ढोल नृत्य व गोंडी गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.तसेच 7 डिसेंबर रोजी समारोपीय कार्यक्रम होणार आहे.पेरमिली पट्टीत होणाऱ्या या विविध कार्यक्रमासाठी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment