Ads

भद्रावती-चोरा सफारीचे उद्घाटन; पर्यटकांसाठी सफारीला सुरुवात.

जावेद शेख तालुका प्रतिनिधी:
भद्रावती तालुक्यातील भद्रावती-चोरा या जंगलसफारीचे उद्घाटन दिनांक २रोज शुक्रवारला भद्रावती शहराचे नगराध्यक्ष अनील धानोरकर यांच्या हस्ते मोठ्या ऊत्साहात पार पडले असुन आजपासुन या जंगलातील जंगल सफारीला रितसर सुरुवात करण्यात आली आहे.
Inauguration of Bhadravati-Chora Safari; Safari begins for tourists
यावेळी नगराध्यक्ष अनील धानोरकर, भद्रावती चे वनपरिक्षेत्र अधिकारी हरीदास शेंडे, वंदना धानोरकर , नगरसेविका सरिता सूर, न प उपाध्यक्ष संतोष सामने, प्रफुल चटकी, चंदू खारकर, विनोद वानखेडे ,सुनील खोब्रागडे, प्रशांत डाखरे, नगरसेविका जयश्री दातारकर, लक्ष्मी पारखी, राखी रामटेके, प्रतिभा निमकर ,लीला ढुमणे, शोभा पारखी आदींची उपस्थिती होती.यावेळी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी जंगलसफारी करुन जंगलभ्रमंतीचा आनंद लुटला.या सफारीदरम्यान नगराध्यक्ष धानोरकर यांनी जंगलातील दर्शन देणाऱ्या काही प्राण्यांना आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केले.नजिकच्या ताडोबा सफारीच्या तुलनेत येथील सफारी ही स्वस्त असुन सर्वसामान्यांना परवडण्यासारखी आहे.त्यामुळे जंगलाचा आनंद लुटण्यासाठी व वन्यप्राणी पाहण्यासाठी पर्यटकांना येथे पर्याय ऊपलब्ध झालाआहे.त्यामुळे पर्यटकांनी येथे येऊन जंगल सफारीचा मनमुराद आनंद लुटावा असे आवाहन नगराध्यक्ष अनील धानोरकर यांनी केले आहे. सदर वनसफारीचे क्षेत्र हे ताडोबा अभयारण्याला लागुनच असुन या जंगलात वाघ, बिबट,अस्वल,रानगवे या प्राण्यांसोबतच ईतर हिंस्त्र तथा तृणभक्षी प्राण्यांची संख्या भरपुर आहे.त्यामुळे वनभ्रमंती करतांना पर्यटकांना या प्राण्यांना बघण्याची मोठी संधी आहे.या सफारीत पर्यटकांना स्वतःच्या वाहणाने जाता येते त्यासाठी प्रती वाहण पाचशे रुपये व गाईडचे तिनशे पन्नास अशी फी आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment