सिंदेवाही: शिवनी वनपरिक्षेञातिल कक्ष क्र. १८५ मध्ये आज दिनांक ३ डिसें. च्या सकाळी वाघाचे 4 पिल्ले मृतावस्थेत आढळून आले. यामध्ये 2नर जातीचे तर 2 मादी जातीच्या पिल्ल्यांचा समावेश आहे. बछडे की अंदाजे वय तीन ते चार वर्ष आहे.
सविस्तर वृत्त शनिवार 3नोव्हेबर2022 च्या सकाळी वनकर्मचारी शिवनी परिसरातील कक्ष क्र.185मध्ये गस्त घालत असतांना त्यांना पट्टेदार वाघाचे 4 बछड़े मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार जितेंद्र रामगावकर संचालक ताडोबा व्याघ्र प्रकल्प, कुशाग्र पाठक उपसंचालक ताडोबा व्याघ्र प्रकल्प बफर, शिवनी वनपरिक्षेत्र अधिकारी भाऊराव तुपे,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद सुरपाम पशुवैद्यकीय अधिकारी सिंदेवाही, डॉ. शालिनी लोंढे सिंदेवाही यांनी कक्ष क्र. 185येथे भेट देऊन पंचनामा केला व चारही बछड़यांना चंद्रपुर येथे डीएनए चाचणी करिता पाठविन्यात आला.
बुधवार दि.30नोव्हेबर 2022च्या सायंकाळी कक्षात मृतावस्थेत एक वाघीन आढळली होती. त्याच वाघीनीचे हे चारही बछड़े असावे असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. डीएनए चाचणीनंतरच बछड़े कुणाचे आहे ते कळेल अशी माहीती जितेंद्र रामगावकर संचालक ताडोबा व्याघ्र प्रकल्प यांनी सांगितले.
0 comments:
Post a Comment