ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी वनविभागातील उत्तर ब्रम्हपुरी व नागभिड वनपरिक्षेत्रातील शेतशिवार परिसरात धुमाकुळ घालत असलेल्या P-2 वाघास (नर) जेरबंद करण्याचे मा. मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) म. रा. नागपूर यांचे आदेश मिळताच.
त्याअनुषंगाने आज दिनांक 03/12/2022 रोजी नागभिड वनपरिक्षेत्रांतर्गत मिंडाळा उपक्षेत्रातील म्हसली नियतक्षेत्रामध्ये (कक्ष क्र. 52 ) डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकिय अधिकारी (वन्यजीव), RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर Tadoba Andhari Tiger Reserve, Chandrapur यांनी व अजय मराठे, सशस्त्र पोलीस यांनी P-2 (नर) वाघास अचुक निशाना साधून दुपारी 2.12 वाजता डार्ट केला व सदर वाघ बेशुध्द झाल्यानंतर त्यास दुपारी 2.38 वाजता पिंज-यात सुरक्षितरित्या बंदिस्त केले.
सदरची कार्यवाही के. आर. धोंडणे, सहायक वनसंरक्षक (तेंदू) ब्रम्हपुरी, एस. बी. हजारे, वनक्षेत्रपाल (प्रा) नागभिड, वनविभागाचे क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी, तसेच RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूरचे सदस्य बी. आर. दांडेकर, ए. एन. मोहुर्ले, एस. पी. नन्नावरे, ए. डी. तिखट, ए. डी. कोरपे,ए. एम. दांडेकर व राकेश अहुजा (फिल्ड बायोलॉजिस्ट, ब्रम्हपुरी) यांचे उपस्थितीत पार पडली.
जेरबंद करण्यात आलेल्या P-2 वाघाचे (नर) वय अंदाजे दोन ते अडीच वर्षे असून त्याला पुढील तपासणीकरिता ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे स्थलांतरीत करण्यात येईल.
0 comments:
Post a Comment