Ads

घंटागाडीत आढळले नवजात अर्भक

भद्रावती तालुका प्रतिनिधी : स्थानिक नगरपालिका क्षेत्रातील घुटकाडा वार्ड येथील १२ नंबरच्या घंटागाडी मध्ये आज (दि.२९) रोज गुरुवारला सकाळी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये नवजात बालक (अर्भक) आढळून आले. कोणीतरी अज्ञाताने त्या घंटागाडी मध्ये अर्भक टाकले व ते मृत अवस्थेत आढळून आले आहे.Newborn baby found in Ghanta Gadi
सदर बारा नंबरची घंटागाडी ही गुरुनगर, घुटकाडा, शिवरकर सोसायटी, दाते प्लॉट, ठेंगे प्लॉट, या परिसरामध्ये फिरते. या परीसरामधील ओला व सुका कचरा जमा करते. त्या गाडीमध्ये हे मृत बालक मिळालेल असल्याने एकच खळबळ माजली आहे.
याबाबतीत जर कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी भद्रावती पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment