Ads

देशी पिस्टल दोन जिवंत काडतूस सह दोन आरोपी अटकेत

 वरोरा :वरोरा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली दिनांक २८ / १२ / २०२२ रोजी  पुन्नमचंद येलय्या मारकरी, रा. माजरी, ता. भद्रावती हा बलेनो चारचाकी कार क. MH34 BR8593 ने नागपूर ते चंद्रपूर मार्गे येत असुन देशी बनावटीची पिस्टल बाळगुन आहे. अशा गोपनीय माहितीवरून रत्नमाला चौक वरोरा येथे त्याचेवर पोलिसांनी सापळा रचून व नाकाबंदी करून संशयीत बलेनो चारचाकी कार क्र. MH34 BR8593 थांबवून १) पुन्नमचंद येलय्या मारकरी, वय ३४ वर्षे, रा. चैतन्य कॉलनी, माजरी, ता. भद्रावती, २) अभिलाष ओदेलू पंचल, वय ३० वर्षे, रा. माजरी कॉलरी, वार्ड नं. ५, माजरी, ता. भद्रावती यांना विचारपूस करून वाहनाची झडती घेतली असता त्यांचे ताब्यात ०१ देशी बनावटीचे पीस्टल (अग्निशस्त्र) व दोन काडतूस असा अंदाजे किंमत रु. १५,०००/- मिळून आले.
Two accused arrested with country pistol two live cartridges
 आरोपीकडून ०१ मारुती बलेनो कार क्रमांक MH34 BR8593, आरोपीचे दोन मोबाईल असा एकूण रू. ५,२६,०००/- जप्त करण्यात आला असुन १) पुन्नमचंद येलय्या मारकरी, वय ३४ वर्षे, . चैतन्य रा. कॉलनी, माजरी, ता. भद्रावती, २) अभिलाष ओदेलू पंचल, वय ३० वर्षे, रा. माजरी कॉलरी, वार्ड नं. ५, माजरी, ता. भद्रावती यांचेवर गुन्हा नोंद करून सदर गुन्हयात अटक करण्यात आली. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक साहेब चंद्रपूर, यांचे मार्गदर्शनात मा. सहा पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा श्री. आयुष नोपाणी साहेब व सपोनि राजकिरण मडावी, पोलीस स्टेशन वरोरा, पोहवा / २७२ जुमडे, नापोकॉ/ २३२१ गुरनुले, नापोकों / २५०९ अनिल बैठा, पोशि/ २७५१ शिंदे नेमणूक पोलीस स्टेशन माजरी, पोशि/ २७५७ दिपक, पोशि/ १४३ काकडे, चापोशि/ ११७३ मंडल नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, वरोरा, नापोशि/ २१८० प्रवीण निकोडे, पो. स्टे. वरोरा यांनी पार पाडली.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment