Ads

घोटनिंबाळा येथील मुख्य रस्ता व नालीचे बांधकाम त्वरित करून द्या.

तालुका प्रतिनिधी( भद्रावती):- भद्रावती तालुक्यातील घोटनिंबाळा येथील मुख्य रस्त्याचे बांधकाम पूर्णपणे उखडलेले असल्यामुळे येथील ग्रामस्थांना येजा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे व त्या रस्त्यालगतच्या नालीचे त्वरित बांधकाम करून देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन घोट निंबाळा येथील माजी उपसरपंच दिलीप राऊत यांच्या नेतृत्वात भद्रावती वरोरा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना देण्यात आले आहे.
Immediately construct the main road and drain at Ghotnimbala.
आमदार धानोरकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी झालेल्या अति पावसामुळे घोट निंबाळा येथील शंकर डाऊले ते जांभुळे यांचे घरापर्यंतचा रस्ता पूर्णतः खराब झालेला आहे .त्यामुळे येथून ये जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण हे दहा-पंधरा वर्षांपूर्वी करण्यात आले होते, यावर्षी झालेल्या अति पावसामुळे ते पूर्णतः वाहुल गेले असून ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहे तसेच या रस्त्यालगत असलेली नाली पूर्णतः बुजलेली आहे .माहूरे ते तलावापर्यंतची नाली बुजून सांडपाणी रस्त्यावर तथा इतरत्र पसरत असल्यामुळे आरोग्याची समस्या व य -जा करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या गंभीर समस्यांकडे त्वरित लक्ष देऊन येथील समस्यांचा निपटारा करून द्यावा व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार धानोरकरांना दिलेल्या निवेदनातून घोटनिंबाळाचे माजी उपसरपंच दिलीप राऊत ,आकाश ढवस, शंकर डाहुले, पियुष राऊत, वर्षा कडाम, माया ढेगळे, गिरजा डाऊले, वर्षा ताडळकर, किरण ढवस, लक्ष्मण ढवस, पुरुषोत्तम कोगरे, स्वप्निल ढेगळे आदींनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment