Ads

*काझीपेट पुणे एक्सप्रेस रोज चालविण्याची मागणी :सुधीर मुनगंटीवार यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

नागपूर:काझीपेट पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही सध्या साप्ताहिक तत्वावर धावणारी गाडी रोज चालवावी अशी मागणी आज चंद्रपूरचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णवRailway Minister Shri Ashwini Vaishnav यांना पत्र लिहून केली आहे.
Demand to run Kazipet Pune Express daily: Sudhir Mungantiwar's letter to Railway Minister
चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना पुणे येथे जाण्याकरता केवळ काझीपेट पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही एकच थेट गाडी सध्या उपलब्ध आहे. ही गाडी आठवड्यात केवळ एकच दिवस धावत असल्याने इतर दिवशी पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते. आजच्या काळात व्यापार उदिम आणि शिक्षणासाठी पुण्यात बरेच नागरिक जा ये करित असतात. मात्र रोज रेल्वे उपलब्ध नसल्याने इतक्या दूरच्या अंतराचा प्रवास नाईलाजाने बसने करावा लागतो किंवा गाड्या बदलत प्रवास करावा लागतो. त्यामुळे या मार्गावर रोज धावणारी एक्सप्रेस गाडी असावी अशी जिल्ह्यातील नागरिकांची मागणी बरीच वर्षे प्रलंबित आहे. त्या अनुषंगाने ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment