मूल: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 17 व 19 वर्षाच्या आतील मुले आणि मुलींचे नागपूर विभागीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे करण्यात आले होते सदर स्पर्धेत नागपूर विभागातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा ह्या सहा जिल्ह्यातील जलवळपास 300 खेळाडूंचा सहभाग होता.
ह्या स्पर्धेत 17 वर्ष आतील मुलींच्या वयोगटात जुन्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया आणि तालुका कराटे-डो असोसिएशन मूल ला संलग्नित कराटे अँड फिटनेस क्लब मूल ची दिव्या किशोर नरड (सेंट अँन्स हायस्कूल,मूल) हिने -44 की.ग्रा. या वजनगटात आणि विधी संजय कोतकोंडावार (सेंट अँन्स पब्लिक स्कूल,मूल) हिने -48 या वजनगटात आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रथम स्थान मिळविले. दोघींनी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय कराटे क्रिडा स्पर्धेमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
दोन्ही विजयी खेळाडू कराटे & फिटनेस क्लब मूल चे संचालक-प्रशिक्षक इम्रान खान सर आणि निलेश गेडाम सर ह्यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव करतात.विजयी खेळाडुंना जुन्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रमुख तथा क्लब चे मार्गदर्शक सेन्सेई विनय बोढे सर यांनी आशीर्वादसह शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच पालक,तालुका कराटे-डो असोसिएशन मूल चे सर्व पदाधिकारी, शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकवृंदानी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत.
0 comments:
Post a Comment