Ads

रविवारला भद्रावतीत स्त्रीमुक्ती परिषद.

तालुका प्रतिनिधी(भद्रावती):- वंचित बहुजन आघाडी भद्रावतीच्या वतीने स्थानिक यशवंतराव शिंदे महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवार दिनांक 25 डिसेंबरला सकाळी 11 वाजता स्त्रीमुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
Women's Mukti Parishad in Bhadravati on Sunday.
या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील पहिल्या फॉरेन रिटर्न सरपंच डॉक्टर चित्रा कु-हे या उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे. यावेळी लेखिका संध्या सुराट कर ,वंचित आघाडीचे राज्य कार्यकारणी सदस्य कुशल मेश्राम, ताटवा चित्रपटाच्या दिग्दर्शिका डॉ. शरयू पाझारे, महिला सक्षमीकरणाच्या मास्टर टेनर रसिदा शेख, वंचितचे जिल्हा प्रभारी राजेश बोरकर, या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून संध्या पेटकर, उद्घाटक एड. दिव्या वाघमारे तर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कविता गौरकार, स्वागताध्यक्ष अश्विनीताई दुधे , पुराणिक गोगले, जयदीप खोब्रागडे, कपूरदास दुपारे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे, तर विशेष अतिथी म्हणून नगरसेविका राखी रामटेके, सीमा ढेगळे, सुनील खोब्रागडे,, सुशील देवगडे, राहुल चौधरी, विजय इंगोले, भीमराव सांगोडे आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणारअसून या परिषदेला मार्गदर्शन लाभणार आहे .यावेळी वर्ग 10 व 12 व्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा, विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा महिलांचा, भद्रावती तालुक्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा, तालुक्यातील निवडून आलेल्या सिनेट सदस्यांचा व शैक्षणिक कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे यावेळी भारतीय संविधान या विषयावर शहरातील आंबेडकर विद्यालयाचे विद्यार्थी पथनाट्य सादर करणार असून चंदा उराडे आणि संच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ही एकांकिका सादर करणार आहे .याशिवाय सायंकाळी चार वाजता महाराष्ट्राचे ख्यातनाम सिने पार्श्वगायक राहुल शिंदे मुंबई यांच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी या परिषदेला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी तालुका, शहर व महिला यांचे तर्फे करण्यात आले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment