चंद्रपूर - बाबूपेठ परीसरात असलेली एकमेव स्मशानभूमी जिथे बंगाली कॅम्प, अष्टभुजा, महाकाली कॉलरी, लालपेठ, आणि संपूर्ण बाबुपेठ परिसरातील जनता शवदहन करण्याकरिता या स्मशानभुमी मध्ये आणतात. अनेक वर्षापासून असलेल्या या स्मशानभूमी कडे मनपा प्रशासनाचे लक्ष न गेल्यामुळे येथे अनेक समस्या उद्भवत आहेत.
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे रोज अनेक शव दहन केले जाते. परंतु एकच शव दाहिनी असल्यामुळे जनतेला याचा त्रास सहन करावा लागतो आहे. त्याकरिता चार शव दाहीनी ची तिथे व्यवस्था करावी. सोबतच येथील जागेवर स्थानिक लोकांकडून अतिक्रमण होत आहे. तिथे संपूर्ण परिसराला वॉल कंपाऊंड करण्यात यावे. जंगलातून आलेला पाण्याचा झरा हा स्मशानभूमी मधून जात असून तो 12 महिने वाहत असतो तिथे आंघोळीकरीता ओटा, करून देण्यात यावा. आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टी चे शहर सचिव तथा मनपा सह प्रभारी राजु कुडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.Electric crematorium in Babupeth built at a cost of Rs 1 crore 2 lakh in dust
गरज नसताना मनपा कडून खनीज निधीतून 1कोटी खर्च करून LPG शव दांहीनी स्मशान भूमी मध्ये बसवली गेली. ज्या मध्ये मागील दीड वर्षात एक ही शव दहन झाले नाही. ही तर जनतेचा पैशाची उधळपट्टी असून यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे करण्यात आली आहे. स्मशानभूमी संदर्भातील मागण्या पूर्ण करण्याकरीता 7 दिवसांत महत्त्वाचे पाऊले उचलली गेली नाही तर जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरू असे आवाहन आम आदमी पार्टीचे शहर सचिव राजू भाऊ कुडे यांनी दिले. या वेळेला जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे शहर युवा अध्यक्ष संतोष बोपचे, झोन अध्यक्ष रहमान खान पठाण, प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंबडे, कृष्णा सहारे, महेश ननावरे, अजय बाथव, भीमराज बगेसर, मुकुंद गटलेवार, सलीम सिद्दिकी तसेच इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment