चंद्रपूर : वरोरा-भद्रावती मतदार संघात सर्वांगीण विकास करण्याकरता धानोरकर दाम्पत्य नेहमी आग्रही असतात. ९ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्य ४१ किमी मॅरेथॉन व वरोरा- भद्रावती तालुक्यातील सेवासप्ताहातून विविध गावात हजारो नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. 41 km marathon organized on birthday of MLA Pratibhatai Dhanorkar*
आज चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात चंद्रपूर - वणी- आर्णी लोकसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, चंद्रपूर (जिल्हा) शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, दिनेश चोखारे, घनश्याम मूलचंदानी, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, सुनिता लोढीया, विजय नळे,अश्विनी खोब्रागडे, सोहेल रजा, विनोद अहिरकर, राजेश अडूर, यांच्यासह महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मॅरॅथॉन स्पर्धेत प्रथम पारितोषिक १ लाख, द्वितीय पारितोषिक ५१ हजार, तृतीय पुरस्कार ३१ हजार, चतुर्थ पारितोषिक २१ हजार, पाचवे पारितोषिक ११ हजार रुपये देण्यात येणार आहे. हि मॅरॅथॉन वरोरा येथील रत्नमाला चौक ते पडोली चौक चंद्रपूर येथे ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६.३० वाजता होणार आहे. या स्पर्धेत राज्यातून मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.
त्यासोबतच वरोरा व भद्रावती तालुक्यातील माढेली, शेगांव, नांदोरी, खांबाडा. टेंभुर्डा, चंदनखेडा, घोडपेठ, माजरी, सालोरी येथे सेवा सप्ताहाचा माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच वरोरा - भद्रावती येथील ५१ मुलींना सायकल वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती विभागात ट्रेलर व व्हील चेअर देण्यात येत आहे. गांधी चौक चंद्रपूर येथे देशभक्ती गीताचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ मोठ्या संख्येत घेण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
0 comments:
Post a Comment