Ads

शेवटी त्या ब्रिजच्या कामाला चार महिन्यात पूर्ण करण्याचे पालकमंत्री यांचे आश्वासन

चंद्रपूर - रामसेतु दाताळा रोड वरील ब्रीज ला रोषणाई करण्याकरिता 3 कोटी रुपये खर्च केले जातात. मात्र बाबूपेठ ब्रिजच्या कामाला गति नाही म्हणून आक्षेप घेत आम आदमी पक्षाचे राजू कूड़े यांच्या नेतृत्वात काही दिवसा अगोदर बाबूपेठ परिसरातील नागरिकांना घेऊन आंदोलन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थी असो अथवा कामावर जाणारे कामगार किंवा आपातकालीन वेळेत रुग्णालयात धाव घेणाऱ्या रुग्णांना या रेल्वे गेट मुळे एक एक तास अडकून राहावे लागते असे असून सुध्दा यावर अजून पर्यंत पालकमंत्री यांनी तोंडून ब्र सुध्दा काढला नाही असा प्रश्न उपस्थित करून तात्काळ कामाला गती न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही आम आदमी पार्टी तर्फे देण्यात आला होता.At last the guardian minister's promise to complete the work of that bridge in four months
त्यानंतर खुद पालकमंत्री यांनी रेल्वे चे वरिष्ठ अधिकारी तथा बांधकाम विभाग यांना 4 महिन्यात बाबुपेठ ब्रिजचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. याकरिता बाबुपेठ चा जनतेनी आम आदमी पार्टी चे शहर सचिव राजू कुडे यांचे आभार मानले. सोबतच त्यांनी प्रश्न उपस्थित करत बाबुपेठ ब्रिज 4 महीन्यात पुर्ण होणे जनतेकरिता आनंदाची बातमी असून जर निवडणूकचा तोंडावर चार महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन फोल ठरल्यास पालकमंत्र्यांचा घरासमोर ढोल वाजवू असा इशारा आप चे शहर सचिव राजू कुडे यांनी दिले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment