भद्रावती तालुका प्रतिनिधी: भद्रावती तालुक्यातील माजरी येथे जिवंत विद्युत प्रवाहाचा स्पर्श होऊन वाघिणीचा मृत्यू Death of a tigress झाल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. रविवार, १५ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास रेल्वेच्या मुख्य लाईनजवळील सी केबिनच्या मागील भागात वाघिणीचा मृतदेह आढळून आला. वाघीण मृतावस्थेत दिसताच याबाबत रेल्वे कर्मचाऱ्याने माजरी पोलिसांना माहिती दिली.Tigress dies due to electric shock
माजरी येथील देवराव पाटेकर यांच्या शेतात वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी जिवंत विद्युत प्रवाहची फेंसिंग करण्यात आली आहे. वाघिणीचा मृतदेह फेंसिंगच्या ताराला गुंडाळला होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. वनविभागाने मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनसाठी पुढे पाठविला असून अहवाल आल्यावर वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल.
0 comments:
Post a Comment